शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेतील ‘मॅरेथॉन’मध्ये नागपूरच्या दोन धावपटूंची चमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 10:43 IST

शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी जगातील अत्यंत कठीण मॅरेथॉनपैकी एक द. आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची किमया आॅरेंजसिटीतील दोन हौशी धावपटूंनी साधली आहे.

ठळक मुद्दे९० किमी अंतर वैभव, अमित यांनी पूर्ण केली कॉम्रेड मॅरेथॉन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी जगातील अत्यंत कठीण मॅरेथॉनपैकी एक द. आफ्रिकेतील ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्याची किमया आॅरेंजसिटीतील दोन हौशी धावपटूंनी साधली आहे. धावपटूंचे आकर्षण असलेली कॉम्रेड मॅरेथॉन आव्हानात्मक आणि तितकीच किचकट मानली जाते.वैभव अंधारे आणि अमित थत्ते यांनी हे अंतर निर्धारित वेळेआधी गाठून युवा धावपटूंसाठी प्रेरणादायी कामगिरी केली. दोघेही प्रो हेल्थ फाऊंडेशन आणि आॅरेंजसिटी रनर्स क्लबचे सदस्य आहेत. दरबन ते पीटरमार्टिजबर्ग या शहरादरम्यान दरवर्षी या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. प्रत्येक १५ किमी अंतर ठराविक वेळेत पूर्ण केलेच पाहिजे, अशी धावपटूंपुढे अट असते. सर्व टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करणारे धावपटू शर्यत पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळेच या शर्यतीला ‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ असेही संबोधले जाते. शर्यत पूर्ण करण्याची निर्धारित वेळ १२ तास होती. वैभवने ११.१९ तासांत ती पूर्ण केली. विशेष असे की वैभव या शर्यतीत दुसऱ्यांदा सहभागी झाला होता. त्याने सलग दुसऱ्यांदा शर्यत पूर्ण करताना २५ मिनिटांनी सुधारणा केली.व्यवसायाने सिव्हिल अभियंता असलेला अमित थत्ते याने ११.४५ तांस वेळ नोंदवित वैभव पाठोपाठ मध्य भारतात दुसरा धावपटू होण्याचा मान मिळविल्याची माहिती प्रो हेल्थ फाऊंडेशनचे संचालक डॉ. अमित समर्थ यांनी पत्रकारांना दिली. या दोघांसोबतच नागपुरातून सहभागी झालेले धावपटू राजेंद्र जैस्वाल आणि डॉ. संजय जैस्वाल हे मात्र शर्यत पूर्ण करण्यात अपयशी ठरले. ८१ किमी अंतर गाठल्यानंतर पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने दोघांनाही रेस सोडावी लागली.या संदर्भात डॉ. समर्थ म्हणाले,‘शर्यतीसाठी सज्ज व्हायला धैर्य लागते. या चौघांनी स्वत:मधील धैर्याचा चांगला परिचय दिला. तयारी म्हणून चार महिने आधीपासून जवळपास १५०० किमी धावण्याचा सराव केला. शिवाय शरीरात लवचिकता यावी यासाठी जिममध्ये व्यायामाचा सराव केला.’ भारतातून जवळपास १२५ जणांनी शर्यतीत भाग घेतल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. कॉम्रेड मॅरेथॉनमधील यशामुळे शहरातील व्यावसायिक आणि मास्टर्स गटातील लोक धावण्यातही प्राविण्य मिळवू शकतात, हे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.व्यायाम आणि धावण्याच्या संस्कृतीत शहरातील नागरिकांनी सहभागी व्हायला हवे, असे समर्थ यांनी आवाहन केले. यावेळी वैभव अंधारे आणि अमित थत्ते, प्रशांत गुर्जर,प्रो हेल्थ फाऊंडेशनच्या संचालक रितू जैन, मुकुल समर्थ यांच्यासह कोच सुनील कापगते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन