शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नागपूरचे 'थ्री इडिएट्स' तयार करतात देशभरातील संस्थांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा

By निशांत वानखेडे | Updated: May 12, 2025 11:13 IST

Nagpur : १५ लाख ते १५ कोटींपर्यंतच्या प्रयोगशाळा

निशांत वानखेडेनागपूर : पुस्तकी अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्यपूर्ण विकासासाठी प्रयोगशाळेतील प्रात्याक्षिकाचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, भारतातील फार थोड्या शैक्षणिक संस्था प्रयोगशाळांनी सुसज्जित असतात, ही शोकांतिका आहे. ही गरज लक्षात घेत नागपूरच्या तीन तरुण अभियंत्यांनी देशातील शैक्षणिक संस्थांना आधुनिक प्रयोगशाळांनी सुसज्जित करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. या 'थ्री इडिएट्स'नी देशातील आयआयटी, एनआयटी अशा प्रिमियम संस्थापासून आदिवासी भागातील शाळांपर्यंत अत्यल्प खर्चात ८५ हून अधिक लॅब विकसित केल्या आहेत.

प्रतीक गडकर, मिर्झा असीम वेग आणि गोविंद सहस्त्रबुद्धे हे ते नागपूरचे तीन अभियंते आहेत, ज्यांच्या सुपिक डोक्यातून ही मानवीय संकल्पना साकार झाली आहे. त्यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या टेक्नोव्हेंटर इनोव्हेशन (टीआय) या नागपूर बेस्ड कंपनीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले आहे. त्यांच्या या कार्याला आता राज्य सरकारचेही पाठबळ मिळाले आहे. देशभरातील २५०० हून अधिक स्टार्टअपच्या स्पर्धेत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे निवडलेल्या सर्वोत्तम २४ स्टार्टअप मध्ये टीआयला सन्मान मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारा टीआय हा विदर्भातील एकमेव स्टार्टअप आहे.

महाराष्ट्र सरकारकडून टीआयला १५ लाख रुपयांचे वर्क ऑर्डर आश्वासन मिळाले आहे. या पाठिंब्यामुळे लहानमोठ्या शहरांमधील आयटीआय आणि शाळांमध्ये सरकार-समर्थित सुसज्जित प्रयोगशाळा स्थापन करणे शक्य होईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यावहारिक कौशल्य विकास, जलद प्रशिक्षणाचा लाभ मिळेल, अशी भावना प्रतीक गडकर यांनी व्यक्त केली. नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री मंगलप्रसाद लोढा आणि विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या समोर टीआयने सादरीकरण केले. लवकरच सरकारच्या मदतीने जळगाव जिल्ह्यात प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या प्रकल्पावर काम करीत असल्याचे प्रतीक यांनी सांगितले.

१५ लाख ते १५ कोटींपर्यंतच्या प्रयोगशाळा२०१६ मध्ये स्थापन केलेल्या टेक्नोव्हेंटर इनोव्हेशन्सद्वारे संपूर्ण भारतात ८५ हून अधिक प्रयोगशाळा तयार करीत आयआयटी, एनआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयटीआय, शाळा आणि इनोव्हेशन हबमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. आयआयटी इंदोर, एनआयटी गोवा, आयआयटी जम्मू, आयआयटी मुंबई या मोठ्या संस्थापासून छत्तीसगडच्या दंतेवाडामध्येही लॅब तयार केल्या आहे. लॅबचे डिझाइन, उपकरणांची निवड, त्यांचे फर्निचर, साहित्य इन्स्टॉलेशन आणि प्रशिक्षणही देण्याचे काम टीआय करते. प्रशिक्षणासाठी विदर्भातील तरुणांना प्रशिक्षित केले जात आहे. संस्थेच्या गरजेनुसार १५ लाख ते १५ कोटींपर्यंत खर्चाच्या प्रयोगशाळा तयार करण्याची क्षमता असल्याचे प्रतीक गडकर यांनी सांगितले.

लिंबू सरबत मशीन ते कोविडचे फेस शिल्डप्रतिक गडकर यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा लिंबू शरबत बनविण्याचे मशीन तयार केले होते, ज्याला भारत सरकारकडून सर्वोत्तम इनोव्हेशनचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर कोविड काळात टीआय कंपनीद्वारे फेस शिल्ड तयार केले. देशभरात १० लाख फेस शिल्ड वितरित करण्यात आले, ज्यासाठी सरकारकडून २०२० मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :nagpurनागपूर