शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची श्रद्धा ठरली ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:57 IST

नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत.

ठळक मुद्देहळूहळू रोवतेय अभिनय क्षेत्रात पावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत.विशेष म्हणजे, श्रद्धा वर्तमानात मँगलोर येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे माहेर नागपूरचे (मुलमुले) आणि सासर औरंगाबादचे असून, पती प्रवीण जवळकर यांच्या नोकरी व्यवसायानिमित्ताने त्या मँगलोर येथे वास्तव्याला आहेत. श्रद्धा यांना महाविद्यालयीन काळापासूनच अभिनय क्षेत्रात रस होता. मात्र, अभ्यास, करिअर आणि विवाहानंतरच्या व्यस्ततेमुळे त्या काळात त्यांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. मात्र, प्रवीण यांच्या प्रोत्साहनानंतर त्यांनी सौंदर्यस्पर्धेत नशीब आजमावण्याचे प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे, त्यांना दहा वर्षाची मुलगी आहे. त्यांनी यापूर्वी मिसेस मँगलोर स्पर्धेत सहभाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात उपविजेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर, त्यांना कोकणी वाहिनीवरील एका मालिकेत संधी मिळाली आणि अभिनयाची हौस भागवता आली. दरम्यान, त्यांनी नागपूरमध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेत त्यांनी विजेतेपदाला गवसणी घालत ‘मिसेस सेंट्रल इंडिया’चा किताब पटकावला आहे. श्रद्धा यांना आता नागपूरमध्ये काही काळ घालवून नाटकांच्या विश्वात रमायचे असल्याची भावना, त्यांनी या विजयानंतर व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर