बारावी निकाल : उपराजधानीत तिन्ही शाखांत विद्यार्थिनींचाच वरचष्मानागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याप्रमाणेच नागपूर विभागातदेखील विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांमध्ये मुलींचेच वर्चस्व दिसून आले. विज्ञान शाखेत यश चांडक पाठोपाठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची श्रेया साबू व शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा प्रसाद चन्नेवार यांनी ९६.२३ टक्के गुण मिळवित दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर वाणिज्यमध्ये रूपल गुप्तापाठोपाठ आदर्श विद्या मंदिर येथील खुशी जैन हिने ९५.५४ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेतदेखील आदर्श विद्या मंदिरच्या मरियम मेमन या विद्यार्थिनीने ९३.३८ टक्के गुण मिळवित अव्वल क्रमांक पटकाविला आहे. या तिन्ही शाखांमध्ये मागील वर्षीप्रमाणे मुलींचाच वरचष्मा कायम आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.विभागातून ७२ हजार ३३१ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ६८ हजार १९८ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.२९ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८९.८८ टक्के इतके आहे.जर नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर २९,४८१ पैकी २८,०६० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९५.१८ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.६१ टक्क्यांनी जास्त आहे. नागपूर जिल्ह्यातून ९०.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.६८ टक्के इतका राहिला.(प्रतिनिधी)टॉपर्स विद्यार्थीविज्ञान शाखामहाविद्यालय टक्केवारी१यश चांडकडॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९७.८५ %२श्रेया साबूडॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९७.२३ %२प्रसाद चन्नेवारशिवाजी विज्ञान महाविद्यालय ९७.३३ %३टिष्ट्वंकल चौधरीडॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९७.०८ % वाणिज्य शाखा१रूपल गुप्ताडॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९७.०८%२खुशी जैनआदर्श विद्यामंदिर९५.५९ %३विदश्रिता दाबकेडॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.३८%कला शाखा१मरियम मेमनआदर्श विद्यामंदिर९३.३८ %२अश्विनी गुप्ताआदर्श विद्यामंदिर९०.२६ %२अलिफिया रामपूरवालाआदर्श विद्यामंदिर ९०.२६ %३अमृता बरबडीकरएलएडी महाविद्यालय८९.२३ %
नागपूरच्या पोरी ‘हुश्शार’...
By admin | Updated: May 28, 2015 02:24 IST