शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकरला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:06 IST

दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने संतोषला १७ एप्रिलपर्यंत पीसीआर मंजूर केला.

ठळक मुद्देकळमना पोलिसांनी ताब्यात घेतले : १७ एप्रिलपर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने संतोषला १७ एप्रिलपर्यंत पीसीआर मंजूर केला.बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचे कटकारस्थान रचल्याच्या आरोपावरून पोलिसांनी संतोषला आरोपी बनविले होते. त्यात पोलीस अटक करणार, अशी कुणकुण लागताच संतोष फरार झाला होता.मध्य नागपुरातील अनेक भागात मटक्याचे अड्डे चालविणारा बाल्या गावंडे प्रॉपर्टी डीलिंगच्या नावाखाली जमिनीच्या वादग्रस्त सौद्यात थेट हस्तक्षेप करीत होता. यातूनच तो कुख्यात संतोष आंबेकरच्या जवळ गेला होता. २०१३ मध्ये बडकस चौकाजवळ ११०० फुटाच्या एका वादग्रस्त जमिनीच्या सौद्यात संतोषचे साथीदार असलेल्या प्रॉपर्टी डीलर काळे, ताजणेकर आणि महेश रसाळ या तिघांना मदत केली होती. ही जमीन नंतर एका कापड व्यावसायिकाला एक कोटी रुपयात विकल्यामुळे कमिशन म्हणून बाल्याने या तिघांना २० लाख रुपये मागितले होते. त्यांनी बाल्याला ६ लाख रुपये दिले. उर्वरित १४ लाख रुपये मिळावे म्हणून बाल्या त्यांना धमकावत होता. त्यामुळे संतोषने हस्तक्षेप करून बाल्याला धमकावले होते. त्यावरून संतोष आणि बाल्याचा वाद झाला. तेव्हापासून बाल्या संतोषच्या नावाने ठिकठिकाणी शिवीगाळ करू लागला. संतोषचा गेम करण्याचीही त्याने भाषा वापरली. बाल्या असे करू शकतो, हे संतोषच्या ध्यानात आले. त्यामुळे त्याने बाल्याला संपवण्याचा कट रचला. बाल्या अवैध धंद्यातून महिन्याला लाखो रुपये मिळवत होता. हे सर्व धंदे त्याचा खास मित्र समजला जाणारा आणि बाल्याला जावई मानणारा कुख्यात गुंड योगेश कुंभारे ऊर्फ सावजी (वय ३०) याला देण्याचे आमिष दाखवून संतोषने सावजीला फितविले. बाल्याच्या हाताखाली काम करून त्याच्या शिव्या खाण्याऐवजी त्याचा गेम करून स्वत:च बाल्याची जागा घेण्याची संधी चालून आल्याने सावजी तयार झाला. त्यानंतर संतोषने माणसांची जुळवाजुळव करून दिली.कटकारस्थानानुसार, २२ जानेवारी २०१७ च्या रात्रीला सावजीने त्याच्या तुकारामनगर, कळमना येथील घरी ओल्या पार्टीचे आयोजन केले. त्यात बाल्याला बोलवून मध्यरात्रीपर्यंत त्याला दारू पाजण्यात आली. तो दारूच्या नशेत टून्न झाल्यानंतर बाल्यावर सावजी आणि त्याचे साथीदार तुटून पडले. तलवारी, चाकूचे घाव घालून सावजी आणि साथीदारांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. कळमना पोलिसांनी या प्रकरणात योगेश कुंभारे ऊर्फ सावजी, पिंकी ऊर्फ गंगाबाई कुंभारे, राजकुमार यादव, प्रशांत बोकडे, शुभम धनोरे, जयभारत काळे, महेश रसाळ आणि नवीन ताजनेकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडाचे कटकारस्थान संतोष आंबेकरने रचल्याचे पुढे आल्यामुळे पोलिसांनी त्यालाही आरोपी बनविले होते. पोलीस अटक करणार, हे लक्षात आल्याने तो फरार झाला. आता दीड वर्ष झाले मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अचानक गुरुवारी तो वकिलासह न्यायालयात पोहचला. तो आत्मसमर्पण करीत असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संतोषची कारागृहात रवानगी करण्यात आली. तेव्हापासून कळमना पोलिसांनी त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. अखेर शुक्रवारी दुपारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले. हत्याकांडाशी संबंधित त्याची चौकशी करायची आहे, असे सांगून पोलिसांनी त्याचा न्यायालयातून १७ एप्रिलपर्यंत पीसीआर मिळवला. या हत्याकांडातील संतोष वगळता सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने आता संतोषला शिक्षा मिळेल, असे कोणते पुरावे पोलीस जमविणार आहेत, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.कारागृह, कोर्टात मोठी गर्दीसंतोषने आत्मसमर्पण केल्यापासून नागपूरच नव्हे तर विदर्भाच्या गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. या पार्श्वभूमीवर, संतोषच्या टोळीसोबतच अन्य टोळ्यांचे गुंडही मोठ्या संख्येत दुपारपासून कारागृह आणि कोर्टाच्या परिसरात जमले होते. संतोषसोबत अनेकांनी बोलण्याचे शेकहॅण्ड करण्याचेही प्रयत्न केले. गुंडांची गर्दी ध्यानात घेता पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला होता.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा