शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महावितरणचा अभियंता व तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:43 IST

शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेले अवैध वीज कनेक्शन पकडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेले अवैध वीज कनेक्शन पकडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपयाची लाच मागणाऱ्या महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ अटक केली. प्रदीप सुदामा शर्मा (३१) रा. धंतोली काटोल, कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी, काटोल ग्रामीण - २ व रवींद्र रामचंद्र बोढाळे (५९) वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण कंपनी, काटोल, अशी आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद जमील मोहम्मद इकबाल (३९) यांनी शेतात पाणी देण्यासाठी अवैध वीज कनेक्शन घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यावर दाखल करण्यात येणारा गुन्हा टाळण्यासाठी उपरोक्त आरोपींनी २५ हजार रुपयाची मागणी केली होती. इकबाल यांनी यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यानच्या काळात रवींद्र बोढाळे यांनी तडजोड करीत प्रकरण १० हजार रुपये देण्याची मागणी इकबाल यांना केली. यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून काटोल येथील हर्ष पान पॅलेस येथे रवींद्र बोढाळे यांना इकबाल यांच्याकडून १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७, ७(अ)नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. उपरोक्त कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी