लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरू असलेले मेट्रोचे कार्य आपल्या कॅमेऱ्याने टिपत अभिनव फटिंग यांनी काढलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.यासह रूपेश बत्तासे, अक्षय पाटील, वैभव साठवणे, सुचानंदन सिंघा आणि रोशन टिंगने या स्पर्धकांना विशेष पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. महामेट्रो नागपूरतर्फे दरमहा फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांकरिता पारितोषिक वितरण सोहळा लवकरच आयोजित केला जाईल. नागपूर मेट्रो आणि मेट्रोचे कार्य सध्या प्रत्येक नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. भावी प्रवाशांसाठी महामेट्रो नवनवीन उपक्रम राबवित असते. एप्रिल महिन्याकरिता आयोजित या स्पर्धेला नागपूरकरांनी उदंड पाठिंबा दिला. पुढील स्पर्धेत मेट्रो प्रकल्पाशी संबंधित फोटो स्वीकारले जाणार आहेत.
नागपूर महामेट्रोचे सर्वात सुंदर छायाचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 10:40 IST
महामेट्रो नागपूरतर्फे घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरू असलेले मेट्रोचे कार्य आपल्या कॅमेऱ्याने टिपत अभिनव फटिंग यांनी काढलेल्या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
नागपूर महामेट्रोचे सर्वात सुंदर छायाचित्र
ठळक मुद्देस्पर्धेत अभिनव फटिंग प्रथम