शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या जीवावर उठले नागपूरचे विमा रुग्णालय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:34 IST

कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा : सोयींचा अभाव, ५० टक्के जागा रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात ४० टक्के औषध असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र, साध्या तापाचेही औषध मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. सध्याच्या स्थितीत दहा दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रुग्णांच्या जीवावर हे रुग्णालय उठल्याचे बोलले जात आहे.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यावधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. परंतु त्याच रुग्णालयात कामगार रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न भेडसावत आहे. रुग्णालात गेल्या वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी भागविले जात होते. सध्याच्या स्थितीत रुग्णालयात दहा टक्केही औषधांचा साठा नसल्याचे या रुग्णालच्या अभ्यागत मंडळावर असलेले सदस्य व राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)चे सचिव मुकुंद मुळे यांनी लेखी लिहून दिले आहे. त्यांनी औषधांसोबतच ५० टक्के रिक्त पदांमुळे बंद होत असलेला एक-एक वॉर्ड, अद्ययावत यंत्रसामुग्री व सोयीच्या अभावाने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात ‘रेफर’ करण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयाचे वेळापत्रक पाळत नसलेले डॉक्टरांमुळे प्रभावित झालेली रुग्णसेवा आदी समस्याही त्यांनी मांडल्या आहेत.

दोन वर्षापासून बालरुग्णांवर अन्याय            

मुळे यांनी सांगितले, कामगार विमा रुग्णालयात बालरोग विभाग नाही. यामुळे येथील रुग्णांना एका खासगी रुग्णालयात पाठविले जायचे. यासाठी करार करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी हा करार संपुष्टात आल्याने बालरुग्ण अडचणीत आले आहेत. बालरुग्णांवर अन्याय होत आहे. दीड कोटींचे बिल एक वर्षापासून पडूननागपुरातील १२ सेवा दवाखान्यांसह (डिस्पेंसरी) अमरावती, अकोला, चंद्रपूर, हिंगणघाट येथील सेवा दवाखान्यातील कामगारांच्या औषधांचे दीड कोटी रुपयांचे बिल एक वर्षांपासून मुंबईचे मुख्य विमा योजनेचा कार्यालयात पडून आहे. परंतु कुणालाच याची काळजी नाही. याचा फटका रुग्णांना बसत असून त्यांना रुग्णालयाचा चकरा माराव्या लागत असल्याचे मुळे यांनी सांगितले. तारांकित प्रश्नानंतरही समस्या कायमच उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याने रुग्णाचा संताप समोर येऊ लागला आहे. येथील डॉक्टर-रुग्णांच्या संबंधामध्ये कटुता आली आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या रुग्णालयाच्या समस्यांच्या वृत्ताबाबत राज्य पावसाळी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला घेऊन रुग्णालयाची पाहणी व समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी रुग्णालयाला भेट दिली. परंतु त्यानंतरही समस्या सुटलेल्या नाहीत, हे विशेष.

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल