शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळ्यावर अवतरणार नागपूरचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:22 IST

देशविदेशातील विविध शहरे हे तेथील ‘लेझर अ‍ॅन्ड लाईट शो’साठी प्रसिद्ध आहेत व त्यांना पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक तेथे जातात. आता नागपूर शहरदेखील जागतिक शहरांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. फुटाळा तलावात संगीत कारंजे तसेच ‘मल्टिमीडिया शो’ची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून फुटाळ्याच्या पाण्यावर नागपूरचा इतिहास व संस्कृती रेखाटण्यात येणार आहे. ‘लाईट्स’, ‘साऊंड’ व ‘लेझर शो’च्या माध्यमातून चालणाऱ्या या ‘शो’चे नियोजन व आखणी ही जागतिक दर्जाचे कलाकार व तंत्रज्ञ करत आहेत हे विशेष.

ठळक मुद्दे‘लाईट्स’, ‘साऊंड’ व ‘लेझर शो’च्या माध्यमातून ‘मल्टिमीडिया शो’ : फ्रान्सच्या धर्तीवर उभारणार संगीत कारंजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशविदेशातील विविध शहरे हे तेथील ‘लेझर अ‍ॅन्ड लाईट शो’साठी प्रसिद्ध आहेत व त्यांना पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक तेथे जातात. आता नागपूर शहरदेखील जागतिक शहरांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. फुटाळा तलावात संगीत कारंजे तसेच ‘मल्टिमीडिया शो’ची सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून फुटाळ्याच्या पाण्यावर नागपूरचा इतिहास व संस्कृती रेखाटण्यात येणार आहे. ‘लाईट्स’, ‘साऊंड’ व ‘लेझर शो’च्या माध्यमातून चालणाऱ्या या ‘शो’चे नियोजन व आखणी ही जागतिक दर्जाचे कलाकार व तंत्रज्ञ करत आहेत हे विशेष.बुधवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. संगीताच्या तालावर नाचणाऱ्या पाण्याच्या कारंज्यावर नागपूरचा इतिहास मांडण्यात येईल. यात नागपूरचा तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, बख्त बुलंदशहाचे कार्य, रघुजी राजे भोसले यांचा राज्याभिषेक, ब्रिटिशांनी घेतलेला ताबा, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात नागपूरचे योगदान, १८९१ तसेच १९२० च्या कॉंग्रेसच्या सभा, महात्मा गांधींना अटक व सीताबर्डी किल्ल्यातील त्यांचे वास्तव्य, केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, भारत छोडो आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती व दीक्षाभूमीचा इतिहास, शहराचे आजचे स्थान इत्यादींवर ‘मल्टिमीडिया शो’ व ‘लेझर शो’च्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येईल. सोबतच येथे संगीत कारंजे वेगवेगळ्या गाण्यांवर चालेल. यात वेळेप्रमाणे व उत्सवानुसार बदलदेखील करण्यात येईल. शास्त्रीय, पॉप संगीताचादेखील यात समावेश असेल. प्रत्येक ‘शो’चा शेवट हा देशभक्तीपर गीतांनीच होईल.आंतरराष्ट्रीय पातळीवर तज्ञांचे नियोजनया संपूर्ण प्रकल्पाचे कंत्राट फ्रान्सच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. ‘मल्टिमीडिया शो’ व संगीत कारंज्याची ‘सिग्नेचर ट्यून’ ही ए.आर.रहमान बनविणार आहेत. तर याला शब्दबद्ध गुलजार करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री रेवती या कलादिग्दर्शन करणार आहेत. तर अल्फोन्सो रॉय हे तंत्रनिर्देशन करतील. ‘साऊंड डिझायनिंग’ हे ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पोकुट्टी हे करतील.विवेकानंदांच्या जीवनकार्यावर प्रकाशसोबतच अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या परिसरातदेखीलदेखील अशाच पद्धतीने ‘मल्टिमीडिया शो’ सुरू करण्यात येईल. यात स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात येईल. शिकागो येथील त्यांच्या ऐतिहासिक भाषणावर आधारित ‘सिग्नेचर ट्यून’ येथील विशेषता असेल.

 

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावnagpurनागपूर