शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपुरातील गोकुळपेठच्या नासुप्र व्यापारी संकुलातील गाळेधारक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:12 PM

गोकुळपेठ बाजारात एनआयटीने बांधलेले व्यापारी संकुल कधी कोसळेल याच्या दहशतीत गाळेधारक आहे. कारण संकुलाच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे इमारतीचे पिल्लर जर्जर झाले आहे. इमारतीवर झाडे उगवली आहे. इमारतीच्या स्लॅपचे काँक्रिट कोसळत आहे. व्यापारी संकुलातील काही व्यावसायिकांनी यासंदर्भात तक्रार एनआयटीकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याने येथे व्यवसाय करणे अवघड झाले आहे.

ठळक मुद्देबेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्याने इमारत झाली जर्जर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोकुळपेठ बाजारात एनआयटीने बांधलेले व्यापारी संकुल कधी कोसळेल याच्या दहशतीत गाळेधारक आहे. कारण संकुलाच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे इमारतीचे पिल्लर जर्जर झाले आहे. इमारतीवर झाडे उगवली आहे. इमारतीच्या स्लॅपचे काँक्रिट कोसळत आहे. व्यापारी संकुलातील काही व्यावसायिकांनी यासंदर्भात तक्रार एनआयटीकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याने येथे व्यवसाय करणे अवघड झाले आहे.या इमारतीला जवळपास ५० वर्षे झाले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संकुलाची कालमर्यादा संपायला आली आहे. संकुलाच्या फ्लोअरिंगला जागोजागी तडे पडले आहेत. संकुलाच्या तळमजल्याचे पाणी विजेच्या मीटरपर्यंत पोहचले आहे. संकुलाच्या तळमजल्यावर संपूर्ण घाण पसरली आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रकोप वाढलेला आहे. संकुलात प्रवेश करताना नाकावर रुमाल झाकल्याशिवाय जाता येत नाही. गाळेधारकांचा आरोप आहे की, नासुप्र व मनपा नियमित टॅक्स वसुली करते, पण संकुलात सोई देत नाही. या संकुलाचे बांधकाम १९६८ मध्ये झाले. संकुलात ३८ व्यापारी प्रतिष्ठाने आहे. सोबतच वखार महामंडळ, केंद्र सरकारचे बीआयएस हॉलमार्क, एनआयटीचे कार्यालयसुद्धा येथे आहे. संकुलात आवश्यक सोईकडे दुर्लक्ष आहे. नियमित सफाई होत नाही. तळघर तर कचराघरात रूपांतरित झाले आहे. संकुलात असलेल्या मूत्रीघराचा वापर बाहेरचे लोक करतात. पार्किंगच्या ठिकाणी लोक लघुशंका करतात. संकुलातील पायऱ्या व पार्किंगच्या ठिकाणी दिव्यांची सोय नाही.रात्रीला भरतो ओपन बारसंकुलात पार्किंगच्या वसुलीसाठी केवळ सुरक्षा रक्षक ठेवलेले आहे. पण पार्किंगच्या परिसरात रात्रीला भरणाºया ओपन बारवर कुणीही कारवाई करीत नाही. परिसरात दारूच्या जागोजागी बाटल्या पडलेल्या दिसतात. या संकुलामध्ये शासकीय आणि खासगी प्रतिष्ठानामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने काम करतो. असामाजिक तत्त्वांचा वापर वाढल्यामुळे महिलांना त्रास होत आहे. महिलांची वाहने काही लोक खराब करीत असल्याच्याही तक्रारी त्यांनी केल्या आहे.इमारतीवर उगविली झाडेइमारतीच्या तिसऱ्या  माळ्यावरील स्लॅबवर व इमारतीच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगविली आहे. स्लॅबवर रेती पडलेली आहे. गिट्टी मातीचे ढिगारे बऱ्याच वर्षापासून आहे. त्यामुळे स्लॅब व भिंंतीमधून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होते. कार्यालयाच्या भिंती खराब झाल्या आहेत. यासंदर्भात वखार महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी नासुप्रच्या सभापतींनाही पत्र लिहून लक्ष वेधले आहे.व्यापारी संकुल असोसिएशनचेही दुर्लक्षव्यापारी संकुलात महिलांना होत असलेल्या त्रासबद्दल व इमारतीच्या दुरावस्थेबद्दल व्यापारी संकुल असोसिएशनला तक्रारीही केल्या आहे. पण असोसिएशनकडून त्यांची दखल घेतली जात नाही, उलट महिलांनाच या असोसिएशनचे पदाधिकारी उलटसूलट बोलत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.तक्रारी करूनही लक्ष नाहीसंकुलातील लोकांच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक येथे लघुशंका करावयास येतात. पार्किंगमध्ये लघुशंका करतात. महिलांच्या गाड्या खराब करतात. बाहेरच्या गाड्या पैसे देऊन येथे पार्क केल्या जातात. स्त्रियांना संकुलात जाणे कठीण झाले आहे. दुर्गंधी आणि डासांमुळे आम्ही व्यावसायिक त्रस्त आहोत. यासंदर्भात मनपा, नासुप्र यांच्यासह पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. पण काहीच सुधारणा होत नाही.मीना सूर्यवंशी, गाळेधारकइमारत कोसळण्याची भीती वाटतेयसंकुलाच्या तळमजल्यावर इतकी घाण झाली आहे की, त्याची सफाईसुद्धा करणे कठीण झाले आहे. तळमजल्यावर १२ महिने पाणी साचले असते. पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. पाण्यामुळे इमारत खराब होत आहे. ही इमारत कधी कोसळेल, याची भीती आम्हाला आहे.नितीन पाटणे, गाळेधारककुणाचेही लक्ष नाही५० वर्षाच्या वर या इमारतीला झाले आहे. इमारतीवर आता मोठमोठे झाडे उगविले आहे. ठिकठिकाणी स्लॅपचे काँक्रिट कोसळत आहे. बेसमेंटच्या पाण्यामुळे इमारतीचे पिल्लर खस्ता झाले आहे. तळघरातील घाण आणि शौचालयामुळे दुर्गंधी सुटली आहे. येथे राहणे कठीण झाले आहे. तक्रारी करूनही कुणाचेही याकडे लक्ष नाही.प्रसाद राव, गाळेधारक.

 

टॅग्स :nagpurनागपूर