शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपूरचे  कामगार विमा रुग्णालय ‘आॅक्सिजनवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:30 IST

सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे असताना आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाचा औषधांचा साठा शिल्लक असल्याने हे रुग्णालय ‘आॅक्सिजन’वर आल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्दे१५ दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा : ‘हाफकिन’कडून औषधांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सुमारे दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात अद्ययावत उपकरण व सोयींच्या अभावाने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे असताना आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाचा औषधांचा साठा शिल्लक असल्याने हे रुग्णालय ‘आॅक्सिजन’वर आल्याचे बोलले जात आहे.नागपूर जिल्ह्यात सुमारे तीन हजार लहान मोठे उद्योग आहेत. यात सुमारे दीड लाखांवर कामगार आहेत. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेझिंन, मॅगनीज इत्यादी घातक रसायने व नायट्रटेच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच इतरही आजार होतात. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून नागपुरात कामगार रुग्णालये स्थापन करण्यात आली. या कामगारांकडून कोट्यावधीची रक्कम शासनाकडे जमा होते, परंतु येथे गंभीर रुग्णांवर उपचारच होत नसल्याचे चित्र आहे. गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. यात औषधांचा तुटवड्यामुळे रुग्णच नाही तर रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे, औषध खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच एकत्रित औषधे खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१८ पासून ही कंपनी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनस्त वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी औषधे खरेदी करणार होती. मात्र दीड महिन्याचा कालावधी होऊनही रुग्णालयांना औषधे उपलब्ध झाली नाही. यामुळे सर्वच रुग्णालये अडचणीत आली आहेत. यात सर्वाधिक फटका बसला आहे तो कामगार विमा रुग्णालयाला. येथे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच औषधांचा साठा शिल्लक आहे.औषधांसाठी प्रस्ताव पाठविला आहेरुग्णालयासाठी आवश्यक औषधे खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. परंतु औषध खरेदीचे अधिकार ‘हाफकिन’ कंपनीला देण्यात आल्याने हा प्रस्ताव या कंपनीकडे असल्याचे समजते. रुग्णालयात मार्च महिना पुरेल एवढा औषधांचा साठा आहे. याची माहितीही आयुक्तांना देण्यात आली आहे.-डॉ. मीना देशमुखवैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी