शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपुरच्या ‘सीपीं’च्या घराजवळ बुलेटने धूमधडाम... पोलिसांनी दिला दणका!

By योगेश पांडे | Updated: March 7, 2024 22:28 IST

आयुक्तांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने काही वेळातच नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडविली.

नागपूर : बुलेट व मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये ‘मॉडिफिकेशन’ करून अक्षरश: फटाके फोडल्यासारखे कर्णकर्कश्श आवाज काढत जाणारे तरुण ही नागपुरकरांची डोकेदुखी बनली आहे. एका अतिउत्साही बुलेटस्वाराने चक्क पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांच्याच निवासस्थानाजवळ बुलेटचे फटाक्यासारखे आवाज काढत धूमधडाम केली. आयुक्तांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने काही वेळातच नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडविली.

बुधवारी रात्री हा प्रकार घडला. प्रिन्स नागेश्वर शुक्ला (१९, परसोडी, जामठा, वर्धा रोड) असे आरोपीचे नाव आहे. तो एमएच ४० सीआर १९२१ या २५० सीसीच्या मोटारसायकलने फिरत होता. त्याने सायलेंसरमध्ये कर्णकर्कश्श आवाज व फटाके फोडल्यासारखा आवाज येईल असे बदल केले होते. बुधवारी पोलीस आयुक्त निवासस्थानी असताना प्रिन्सने तेथे मोटारसायकलचे फटाके वाजविले. पोलीस आयुक्तांनी तातडीने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले.

पोलिसांनी लगेच शोधाशोध करण्यास सुरुवात केली. तो तरुण फुटाळ्याच्या दिशेने गेल्याची बाब कळाली. पोलिसांनी तेथून त्याला ताब्यात घेतले. तो विना हेल्मेट व वेगमर्यादेचे उल्लंघन करून मोटारसायकल चालवत होता. त्याला ११ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तो मुळचा मध्यप्रदेशातील रिवा येथील रहिवासी असून फुटाळा परिसरात का आला याचे समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बुलेटचे फटाके फोडाल तर खबरदारपोलीस आयुक्तांकडे याअगोदरदेखील अशा बेजबाबदार मोटारसायकलस्वारांच्या तक्रारी आल्या आहेत. वाहनाच्या यंत्रणेच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे हा मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा आहे. म्हणून कुणीही मोटरसायकलच्या सायलेंसरमध्ये बदल करू नये. अषाप्रकारे सायलेंसरच्या रचनेमध्ये बदल करून वाहन चालवितांना मोठा आवाज करणारे चालक दिसले तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षशहरातील सर्वच भागात असे अतिआगावू मोटारसायकलस्वार आहेत. काही विशिष्ट गॅरेजेसमध्ये हे बदल करून दिले जातात. त्याचीदेखील पोलिसांना माहिती आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून अशा मोटारसायलस्वारांवर हवी तशी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अशा नियमतोड्या तरुणांची हिंमत वाढली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर