शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

नागपूरच्या सीपी क्लबमधील मारहाण प्रकरण :आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:29 IST

उपराजधानीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवणारा आरोपी जसप्रीत तुली याला अखेर अटक करण्यात सदर पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता.

ठळक मुद्देव्यापाऱ्यावर केला होता प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लबमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवणारा आरोपी जसप्रीत तुली याला अखेर अटक करण्यात सदर पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता.मंगळवारी, ६ नोव्हेंबरच्या रात्री व्यापारी बांधवांनी सीपी क्लबमध्ये दिवाळी मिलनची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सदरमधील प्रतिष्ठित फर्निचर व्यापारी ब्रजेश सुशील खेमका त्यांच्या मित्रांसह सहभागी झाले होते. मध्यरात्रीनंतर सुमारे १ च्या दरम्यान खेमका बाथरूमला जात असताना त्यांना काही तरुणांमध्ये वाद होताना दिसला. वाद वाढू नये म्हणून खेमका यांनी सद्भावनेने त्या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद करणाऱ्यांपैकी जसप्रीत तुली नामक आरोपीने खेमका यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. बाजूला असलेले काचेचे ग्लास उचलून खेमका यांच्या डोक्यावर फोडले. यामुळे खेमका यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, आरडाओरड ऐकून कार्यक्रमातील व्यापारीबांधव धावल्याने आरोपी जसप्रीत आणि त्याचे मित्र शिवीगाळ करून धमकी देत पळून गेले. खेमका यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांना गंभीर दुखापत असल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे सदर पोलिसानी आरोपी जसप्रीत तसेच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या घटनेला दोन आठवडे झाले आहे. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळत नसल्यामुळे व्यापारी बांधवांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला होता. आरोपींना पोलीस अटक करणार की नाही, असा प्रश्नही व्यापारी बांधवांमध्ये यानिमित्ताने चर्चेला आला होता. या पार्श्वभूमीवर, सदर पोलिसांनी अखेर सोमवारी रात्री जसप्रीत तुलीला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असल्याचे ठाणेदार सुनील बोंडे यांनी लोकमतला सांगितले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक