शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांनी जमा केल्या २ हजार कोटींहून अधिक दोन हजारांचा नोटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 21:50 IST

बँकांना थेट रिझर्व्ह बँकेत जमा करण्याची मुभा : ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

- मोरेश्वर मानापुरे

नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर ग्राहकांनी बँकेत नोटा जमा करण्यासाठी आणि बदली करून घेण्यासाठी गर्दी केली. आधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी सव्वा चार महिन्यात २ हजाराच्या जवळपास २ हजारांहून अधिक कोटी रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्याची बँकांची अधिकृत माहिती असून ही आकडेवारी ९८ टक्के आहे.

नागपूरकरांनी अखेरच्या आठवड्यात सर्वाधिक नोटा जमा केल्या आहेत. ग्राहकांना नोटा बँकेत जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबर होती. काही सहकारी बँका आणि पतसंस्थांनी २७ सप्टेंबरपर्यंत नोटा स्वीकारल्या आणि त्याच दिवशी रिझर्व्ह बँकेत जमा केल्या. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार १९ मे रोजी देशात ३.४२ लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या. तर २९ सप्टेंबरपर्यंत ९६ टक्के नोटा बँकेत जमा झाल्या. अखेरच्या दिवशी ९८ टक्क्यांपर्यंत नोटा जमा झाल्याची माहिती आहे. आता २ टक्के नोटा जमा होणे बाकी आहे. त्यातील काही ७ ऑक्टोबरपर्यंत जमा होतील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.२ हजाराच्या नोटेची चलनातून देवाणघेवाण थांबली२ हजाराची नोट २९ सप्टेंबरपर्यंत चलनात ग्राह्य धरण्यात येईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी जाहीर केले होते. त्यानंतर नोट बदलीसाठी अनेकांनी बँकेकडे धाव घेतली आणि नोटा बदलवून घेतल्या किंवा खात्यात जमा केल्या. पण रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर २ हजाराची नोट चलनातून अप्रत्यक्षरीत्या बंद झाल्याचा अनुभव ग्राहकांना १९ मेनंतर येऊ लागला. बाजारात फार कमी लोक या नोटा स्वीकारताना दिसत होते. रिझर्व्ह बँकेने २ हजाराची नोट बँकेत जमा करण्याची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक