शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

नागपूरकरांनो, आता तक्रार करा, ‘हॅलो महापौर अ‍ॅप’ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:51 IST

नागपूर शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे आता हॅलो महापौर अ‍ॅपवरून निराकरण होणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या समस्या मार्गी लागणारस्वच्छतागृहांची माहिती मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क साधता यावा, त्यांना समस्या, तक्रारी मांडता याव्यात, यासाठी आता कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. हॅलो महापौर अ‍ॅपवरून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होईल. अ‍ॅपच्या माध्यमातून आता नागरिकांना मोबाईलवरूनच आपल्या सूचना, तक्रारी थेट महापौरांपर्यंत पोहचविता येणार आहेत. तसेच शहरातील स्वच्छतागृहांची माहिती उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपचे महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी लोकार्पण केले. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागरिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. यात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारीसाठी नागरिकांना कुठे जाण्याची गरज भासू नये, यासाठी अ‍ॅप बनविण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर तो तयार करण्यात आला. गरज भासल्यास यात पुन्हा सुधारणा केल्या जातील, अशी माहिती संदीप जोशी यांनी यावेळी पत्रकारांना दिली.सध्या प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया व स्मार्ट फोनचा वापर करतात. त्यांनी मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊ न लोड केल्यास तक्रार करता येईल. तसेच तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली, याची माहिती तक्रारकर्त्यांना दिली जाईल. झोनस्तरावर जनता दरबार घेतले जात आहेत. यात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. मंगळवारी झोनमधील एक तक्रार मागील अनेक महिन्यापासून आहे. यासंदर्भात झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊ त यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हॅलो महापौर अ‍ॅपच्या माध्यमातून थेट महापौरांच्या व्हॉट्सअ‍ॅपशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची तक्रार स्वत: महापौर पाहून त्यावर प्रशासनाला निर्देशित करतील. महापौरांकडे आपल्या तक्रारी मांडल्यानंतर आपल्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहितीही आॅनलाईन घरबसल्या पाहता येणार आहे. या अ‍ॅपसाठी मनपा मुख्यालयात विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.अशी नोंदवा तक्रारगुगल प्ले-स्टोअरवरून हॅलो महापौर हे अ‍ॅप डाऊनलोड करा.तक्रार नोंदवा या आयकॉनवर क्लिक करा.आपले झोन, तक्रारीचे स्वरूप, पूर्ण नाव, संपर्क क्रमांक यासह संपूर्ण तक्रार नोंदवून संपादन यावर क्लिक करा.

अ‍ॅपची वैशिष्ट्येअ‍ॅपवरून थेट महापौरांच्या व्हॉट्सअ‍ॅपशी कनेक्ट होता येईल.मनपाच्या विविध योजनांची माहिती मिळविता येईल.४मनपाच्या दैनंदिन बातम्या पाहता येतील. ४झोननिहाय तक्रार नोंदविता येईल.४स्वच्छ नागपूर आयकॉनवरून कचरा संकलन करणाºया एजन्सीशी संपर्क साधता येईल. ४गुगल मॅपवरून आपल्याला जवळील स्वच्छतागृह शोधता येतील.४मनपातर्फे यशस्वीरीत्या राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची यशोगाथा अ‍ॅपद्वारे जाणता येईल.

टॅग्स :Mobileमोबाइल