शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:31 IST

गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रती विद्यार्थी सहा हजाराची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.विद्यार्थ्याच्या गावातून शाळा १ किलोमीटरच्या वर असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील ५५ विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी वार्षिक तीन हजार रुपयेप्रमाणे प्रवास भत्ता दिला होता. मुळात भत्ता देण्याचे दुसरेही एक कारण म्हणजे जि.प.च्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५३१ शाळा आहे. या शाळांची पटसंख्या ही दरवर्षी घसरतच चालली आहे. चार वर्षांत पटसंख्या १६ हजाराने घटली आहे. यंदा जि.प.शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही ७१ हजार ४४८ इतकी आहे. गतवर्षी शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर शाळेत जाणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना प्रवासभत्त्यापोटी ३०० रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्याकरिता ३ हजार रुपये देण्यात आले होते. यंदा शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा मानस बाळगला आहे. गेल्या वर्षी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही समायोजन करण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शासनाला आहे. सोबतच शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, पूर्वी सर्व शिक्षा अभियाना आता 'समग्र'अंतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे. तो कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरzpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी