शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नागपूर झोनमध्ये पहिल्यांदा २२,०४३ कोटींचे विक्रमी जीएसटी संकलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:10 IST

Nagpur : विदर्भाचा औद्योगिक विकास वेगात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ जुलै २०१७ पासून देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर विदर्भ झोनमध्ये पहिल्यांदा जीएसटीचे विक्रमी संकलन झाले. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या २०,८०६ कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संकलन २२,०४३ कोटींवर पोहोचले. संकलनात एका वर्षात १,२३७कोटींची वाढ झाली. ही वाढ म्हणजे विदर्भात औद्योगिक विकास वेगाने होत असल्याचे द्योतक आहे.

नागपूर झोनमध्ये नागपूर-१, नागपूर-२, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे विभाग येतात. चारही विभागांत जीएसटी संकलन वाढले. नागपूर-१ मध्ये ५,५३६ कोटी, नागपूर-२ मध्ये ६,१६५ कोटी, नाशिक ५,८८२ कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागात ४,४६० कोटींचे संकलन झाले. या संकलनात विदर्भानेही बाजी मारली आहे. २०२२-२३ मध्ये झोनला १६,९०९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तो २०२३-२४ मध्ये २०,५०६ कोटी आणि २०२४-२५ मध्ये २२,०४३ कोटींवर पोहोचला. चार आयुक्तालयांपैकी नाशिक विभागातील उद्योगात चांगली भरभराट झाल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटोमोबाइल उद्योग जास्त आहेत. त्यानंतरही या विभागाचा जीएसटी संकलनात वाटा कमीच आहे. नागपूर-१ आणि नागपूर-२ आयुक्तालयांनी मिळून ११,७०१ कोटी रुपयांचे योगदान दिले. हे सुमारे ५० टक्के आहे. 

सर्वाधिक जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांमध्ये स्टर्न कोलफिल्ड लि., अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट, दामोदर जगन्नाथ, इंडयोरन्स टेक, सनफ्लॅग, बॉस, एमआरजेपीटी स्टील, ब्रह्मोस, एसएमडब्ल्यू इस्पात, कामधेनू स्टील आदींचा समावेश आहे.

तुलनात्मक तक्ता (कोटींमध्ये)२०१९-२०                 १२,६४९२०२०-२१                  ११,४५५२०२१-२२                 १४,४८५२०२२-२३                 १६,९०९२०२३-२४                 २०,८०६२०२४-२५                 २२,०४३

आघाडीच्या दहा कंपन्यांमधून ७० ते ७५ टक्के जीएसटी संकलननागपूर झोनमधील आघाडीच्या दहा कंपन्यांमधून ७० ते ७५ टक्के संकलन झाले. या कंपन्यांच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीचा थेट परिणाम संपूर्ण झोनच्या महसुलावर होतो. नागपूर झोनमध्ये इतर अनेक मोठ्या कंपन्या आहेत; परंतु त्यांचे मुख्य कार्यालय मुंबईत असल्याने ते मुंबईत जीएसटी भरतात. याचा फटका नागपूर विभागाला बसतो. नागपूर झोनमध्ये असणाऱ्या आणि मुंबईत जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांची संख्याही जास्त आहे.

झोनमधील आयुक्तालयाचे योगदान (कोटींमध्ये)झोन                      २०२१-२२                २०२२-२३               २०२३-२४                २०२४-२५नागपूर                   १३,४७८                   ४,०९२                  ५,२३९                    ५,५३६नागपूर                   २४,६६५                  ५०४०                   ५,९१४                     ६,१६५औरंगाबाद              २,९७६                    ३,४९९                  ४,१७४                    ४,४६०नाशिक                  ३.३६४                     ४,२७६                 ५,४७९                    ५,८८२

टॅग्स :GSTजीएसटीnagpurनागपूर