शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  जिल्हा परिषदेचे हरविले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 20:55 IST

जिल्हा परिषदेला २०१०-११ साली आयएसओ मानांकन मिळाले होते. ज्या उद्देशासाठी हे मानांकन मिळाले होते तो उद्देश तर आता हरविलाच आहे. नुकत्याच शिक्षण विभागातून शिक्षकांच्या फाईल्स गायब झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेला मिळालेले आयएसओचे मानांकन व त्यासंदर्भातील कागदपत्रेसुद्धा हरविली आहेत. असे खुद्द जिल्हा परिषदेचे जनमाहिती अधिकारी यांनी राज्य माहिती आयुक्तांपुढे कबूल केले असून तसे शपथपत्र लिहून देतो, असे सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. याच कारणासाठी जिल्हा परिषदेला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.

ठळक मुद्देजनमाहिती अधिकाऱ्या ची आयुक्तांपुढे कबुली : त्यामुळे द्यावी लागली १० हजार नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेला २०१०-११ साली आयएसओ मानांकन मिळाले होते. ज्या उद्देशासाठी हे मानांकन मिळाले होते तो उद्देश तर आता हरविलाच आहे. नुकत्याच शिक्षण विभागातून शिक्षकांच्या फाईल्स गायब झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेला मिळालेले आयएसओचे मानांकन व त्यासंदर्भातील कागदपत्रेसुद्धा हरविली आहेत. असे खुद्द जिल्हा परिषदेचे जनमाहिती अधिकारी यांनी राज्य माहिती आयुक्तांपुढे कबूल केले असून तसे शपथपत्र लिहून देतो, असे सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. याच कारणासाठी जिल्हा परिषदेला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे.कामाची सुसूत्रता, स्वच्छता, तक्रारकर्ते, अभ्यागतांच्या कामाचा होत असलेला निपटारा या सर्व बाबींचे निरीक्षण करून आयएसओ मानांकन संस्थेला दिले जाते. जिल्हा परिषदेला आयएसओ मिळाल्यानंतर त्यातील उद्देशाची अंमलबजावणी होत नसल्याने हेमंत गांजरे यांनी जिल्हा परिषदेला आयएसओ प्रमाणपत्रासंदर्भात काही माहिती माहिती अधिकारात मागितली होती. यात आयएसओ प्रमाणपत्राची दरवर्षीची साक्षांकित प्रत, आयएसओ कार्यालयाचा पत्ता, ज्या अटींच्या अधीन राहून आयएसओ दिले, त्या अटींची यादी, आयएसओ प्रमाणपत्रांतर्गत पुरविण्यात येणाºया सेवांची यादी, अभ्यागत व तक्रारकर्त्यांना आयएसओअंतर्गत कुठल्या सेवा पुरविल्या जातात आदी माहिती १५ आॅक्टोबर २०१५ मध्ये मागितली होती. ३० दिवसांत जिल्हा परिषदचे जनमाहिती अधिकारी माहिती देऊ न शकल्याने १८ नोव्हेंबर २०१५ ला पहिले अपील दाखल केले. यासंदर्भात तीन-चार सुनावण्या झाल्या. परंतु प्रत्येक सुनावणीला जनमाहिती अधिकारी उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे गांजरे यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील केले. तेथेही ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी आयोगाकडेच तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने २८ फेब्रुवारी २०१८ ला झालेल्या सुनावणीत तक्रारकर्त्याला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई जनमाहिती अधिकाºयांनी दिली. त्याचबरोबर येत्या १५ दिवसांत तक्रारकर्त्यास विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.जनमाहिती अधिकाºयांनी १० हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली. परंतु तक्रारकर्त्यांनी मागितलेली माहितीच उपलब्ध नसल्याचे आयुक्तांपुढे कबूल केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर