शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद राबविणार शुन्य कचरा धोरण - सीईओ सौम्या शर्मा

By गणेश हुड | Updated: October 2, 2023 16:43 IST

एक तास स्वच्छतेसाठी महाश्रमदान

नागपूर : शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांची ग्रामीण भागासोबतच जिल्हा परिषद स्तरावर  प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रमांतर्गत महाश्रमदान कार्यक्रम राबवून  शून्य कचरा धोरण राबण्याचा संकल्प करण्यात आला. ओला व सुका कचरा, कागद, स्टेशनरी साहित्य, प्लास्टिक कचरा, ई-वेस्ट यांचे योग्य व्यवस्थापन करणार असल्याची माहिती जि.प. प्रशासनाने  मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली.

स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत रविवारी  एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याचे पंतप्रधानांनी देशाला आवाहन केलेले होते. त्यानुसार जि.प.मध्ये महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

श्रमदानातून जि.प. कार्यालय,परिसर स्वच्छ - सुंदर ठेवा,  प्रत्येक विभागातील कर्मचा-यांनी श्रमदान करतांना  कार्यालयीन व्यवस्थापनांमध्ये विविध ठिकाणांवर आवश्यक  असलेल्या  सुधारणांसाठीचे वैयक्तिक अभिप्राय  लिखीत स्वरुपात देण्याच्या सूचना सौम्या शर्मा यांनी केल्या. महाश्रमदानात जि.प.च्या  विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या कार्यालयातील अंतर्गत स्वच्छता केली. 

जिल्हा परिषदेत शून्य कचरा धोरण राबविण्याच्या अनुषंगाने शर्मा यांनी जि.प.च्या नविन व जून्या इमारतींमधील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देवून कार्यालयीन स्वच्छतेबाबत पाहणी केली. आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे,  कचरा संकलन केंद्र, विभागनिहाय कचरा संकलन व्यवस्था ईत्यांदींची पाहणी करुन आवश्यक सूचना विभाग प्रमुखांना केल्या. जि.प.सोबतच पंचायत समित्या, ग्रामपंचायतीत एकाच दिवशी महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाzpजिल्हा परिषदnagpurनागपूर