शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद :सर्वसाधारण सभेसाठी हवे सुरेश भट अथवा देशपांडे सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 20:57 IST

जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेसाठी सुरेश भट सभागृह अथवा देशपांडे सभागृह मिळावे, अशी मागणी जि.प. अध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरेश भट सभागृहासाठी मनपा आयुक्तांना पत्रही पाठविले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अध्यक्षांची मागणी : मनपा आयुक्तांनाही दिले सभागृहासाठी पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या सत्तांतरानंतर अजूनही सर्वसाधारण सभा होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विषय सभेच्या मंजुरीविना प्रलंबित पडले आहेत. त्यामुळे जि.प. प्रशासनाने सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात कोविड-१९ चे पालन करणे म्हणजेच सामाजिक अंतर ठेवणे शक्य होणार नाही; त्यामुळे जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेसाठी सुरेश भट सभागृह अथवा देशपांडे सभागृह मिळावे, अशी मागणी जि.प. अध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरेश भट सभागृहासाठी मनपा आयुक्तांना पत्रही पाठविले आहे.जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. कोविड-१९ मुळे यंदा सत्ताधाऱ्यांना अर्थसंकल्पही सादर करता आला नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान केली. अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान झाली असली तरी विविध विकास कामांना सर्वसाधारण सभेतून परवानगी (मंजुरी) प्रदान केल्यानंतरच कामे मार्गी लागतात. तीन महिन्यातून सर्वसाधारण सभा घेण्याचा नियम आहे. परंतु सत्तास्थापनेला पाच महिने लोटूनही सभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाची विकास कामे, महत्त्वाच्या फाईल्स, कामांना मंजुरी मिळणे बाकी आहे. महाराष्ट्र जि.प. व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १११ नुसार सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. जि.प. प्रशासनाने २४ मार्च रोजी सभा घेण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सभेची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता जूनच्या अखेरपर्यंत सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जि.प.कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.कोविड-१९ च्या नियमांचे पालन होईलजिल्हा परिषदेच्या सभागृहात कोविड-१९ च्या नियमांचे पालन होऊ शकत नाही. त्यामुळे जि.प.ने दोन सभागृहाचे प्रस्ताव ठेवले आहेत. सभा घेण्यापूर्वी सभागृहाचे पूर्णत: निर्जुंतीकीकरण करण्यात येईल; सोबतच ५८ सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला मास्क व सॅनिटायझरचेही वाटप करण्याचे जि.प.ने नियोजित केले आहे. जिल्हाधिकाºयांकडून सभेला परवानगीची व मनपा आयुक्तांकडून सभागृह उपलब्ध करून दिल्यास महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वसाधारण सभा पार पडेल.रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प. नागपूर

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर