शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष ‘क्वारंटाईन,’ सभा लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:20 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्यानंतर अध्यक्षांनाच क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्यामुळे २४ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा पुढे ढकलावी लागणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांचे पतीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे अध्यक्षांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. सदस्यांमध्येही कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. समितीच्या मासिक बैठकीला सदस्य उपस्थित राहत नसल्याने बैठका तहकूब होत आहे. सर्वसाधारण सभेला सर्व सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. सर्व अधिकारीसुद्धा उपस्थित असतात. जवळपास १०० ते १२५ लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात. कोरोनाच्या काळात ही सभा होणे धोक्याचे आहे. सर्वसाधारण सभेअभावी ग्रामीण भागातील विकासकामांच्या अनेक मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्यातच अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण सभेची परवानगी आवश्यक आहे. विकासकामांना खीळ बसली आहे. हे लक्षात घेता अध्यक्षांनी सभा होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळविली आणि सभागृह सुद्धा निश्चित केले. २४ जुलै तारीखही निश्चित झाली आहे. सभेची नोटीसही निघाली. परंतू आता निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सभा पुढे ढकलावी लागणार आहे. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी सुद्धा यासाठी दुजोरा दिला आहे.सध्या मी शासन नियमानुसार गृह विलगीकरणात आहे. सदस्यांमध्ये सुद्धा कोरोनाची भीती आहे. त्यामुळे २४ जुलै रोजी होणारी सभा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाकडे विनंती करणार आहे. यासंदर्भात सीईओंशीही चर्चा करण्यात आली आहे.रश्मी बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषदसभेवरून मतभेद२४ जुलै रोजी सभा झालीच पाहिजे, अशी भूमिका शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील यांनी व्यक्त केली. अनेक विषय प्रलंबित आहेत. सभेच्या मान्यतेशिवाय काम होणार नाही. कोरोनाची भीती ठेवत ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसता कामा नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सभा २४ जुलै रोजी होईल, असे मत कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी व्यक्त केले.विरोधक म्हणतात सभा झाली पाहिजेसदस्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावयचे आहेत. पाच महिन्यापासून सभा झाली नाही. निश्चित तारखेत सभा घेण्यासाठी आमचा आग्रह आहे. अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्षांकडे जबाबदारी द्यावी.अनिल निधान, विरोधी पक्षनेते

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या