शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद : विरोधकांना हाकलले सभापतींच्या कक्षातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:23 IST

जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदस्यांसाठी अधिकृत कक्ष नसल्याने सभापतीच्या कक्षात कुणीच नाही म्हणून पत्रपरिषद सुरू केली. पत्रपरिषद सुरू असतानाच सभापती आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरल्याने विरोधकांना जि.प.च्या वऱ्हांड्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.

ठळक मुद्देवऱ्हांड्यात घ्यावी लागली पत्रपरिषद : सदस्यांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदस्यांसाठी अधिकृत कक्ष नसल्याने सभापतीच्या कक्षात कुणीच नाही म्हणून पत्रपरिषद सुरू केली. पत्रपरिषद सुरू असतानाच सभापती आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरल्याने विरोधकांना जि.प.च्या वऱ्हांड्यात पत्रकार परिषद घ्यावी लागली.विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्य राजेंद्र हरडे, सुभाष गुजरकर, कैलास बरबटे, राधा अग्रवाल, व्यंकट कारेमोरे आदी उपस्थित होते. समाजकल्याण सभापती नेमावटी माटे यांच्या कक्षात त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली असतानाच, त्या आल्या, त्यांनी लवकर आटोपा असा आग्रह धरला. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या कक्षातून काढता पाय घेत, जिल्हा परिषदेच्या वºहांड्यातच पत्रकारांना माहिती दिली. विरोधी सदस्यांना बसायलाही जागा नाही, अशी ओरड करीत, कुलूपबंद असलेल्या एका कक्षाचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे या पत्रपरिषदेला विरोधी पक्षनेता यांच्यासोबत समाजकल्याण समिती सदस्यसुद्धा उपस्थित होते. सदस्यांचे म्हणणे आहे की, समाजकल्याण सभापतींचा कक्ष खाली होता. आम्ही त्यांच्या खुर्चीवर बसलो नव्हतो. कक्षात त्यांची कुठलीही बैठकही नव्हती. आम्हाला त्यांच्यापुढे माहिती देण्यास काही हरकतही नव्हती. पण लवकर आटोपा, असा आग्रह करीत त्यांनी सदस्यांचा अपमान केला आहे.अध्यक्षांच्या कक्षातही झाला सदस्याचा अपमानएका कामासाठी सदस्य राधा अग्रवाल या अध्यक्षांच्या कक्षात गेल्या. अध्यक्ष नव्हते, पण त्यांचे पती तेथे उपस्थित होते. ते काही लोकांसोबत चर्चा करीत होते. त्यांनी महत्त्वाची बैठक असल्याचे सांगून, तुम्ही बाहेर थांबा असे अग्रवाल यांना सांगितले. अध्यक्ष नसताना त्यांच्या कक्षात त्यांचे पती बैठका घेतात आणि सदस्यांना बाहेर उभे करतात, या घटनेचाही त्यांनी निषेध केला.- आम्ही या घटनेचा निषेध करतो. सीईओंनी विरोधकांसाठी एक कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सीईओंकडे करणार आहे.अनिल निधान, विरोधी पक्षनेता

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरPoliticsराजकारण