शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद : ३६.५६ कोटींचा अर्थसकंल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:01 IST

जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती उकेश चव्हाण यांनी गुरुवारी जि.प.चा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ५६ लाख १४ हजार ५०८ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी कात्री लावली आहे. शिक्षण, समाजकल्याण व सामूहिक विकास कार्यक्रमासाठी बजेटमध्ये तरतूद वाढविली आहे.

ठळक मुद्देशिक्षण, समाजकल्याण, सामूहिक विकासाला प्राधान्य कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकामाला कात्रीविरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांकडून समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती उकेश चव्हाण यांनी गुरुवारी जि.प.चा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ५६ लाख १४ हजार ५०८ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी कात्री लावली आहे. शिक्षण, समाजकल्याण व सामूहिक विकास कार्यक्रमासाठी बजेटमध्ये तरतूद वाढविली आहे.जिल्हा परिषदेच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात ३६,५६,१४,५०८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज गेल्या वर्षीचा संभाव्य अखर्चित निधी धरून यंदा एकूण ३७,२५,९१,००१ रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षीचा संभाव्य अखर्चित निधी हा ६९,७६,४९३ इतका गृहित धरला आहे. परंतु, वास्तविक पाहता फेब्रुवारी महिन्यापर्यंत गेल्या अर्थसंकल्पातील केवळ ६० टक्के निधी खर्च झाल्याची कबुली स्वत: अर्थ समिती सभापती उकेश चव्हाण यांनी सभागृहात दिली. त्यामुळे उर्वरित ४० टक्के निधी पुढील पावणेदोन महिन्यात कसा खर्च होणार हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.दुष्काळ लक्षात घेऊन बजेट अपेक्षित होतेनागपूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. तीन तालुके व आठ मंडळ शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. भविष्यात पाण्याचे भीषण संकट उभे ठाकणार आहे. याचा विचार बजेटमध्ये करण्यात आला नाही. कृषी, पाणी पुरवठा या विभागावर भरीव तरतूद अपेक्षित होती.मनोहर कुंभारे, विरोधीपक्ष नेतेऔपचारिक बजेटपुनर्विनियोजनाने हे बजेट पूर्वीच करायचे होते. बजेटमध्ये संभावित अखर्चित निधी दाखविला. घाईघाईत केलेले आणि अभ्यासपूर्ण नसलेले हे बजेट आहे.चंद्रशेखर चिखले, माजी उपाध्यक्ष, जि.प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरBudgetअर्थसंकल्प