शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेलाही निवडणुकीची प्रतीक्षा : दोन वर्षे फुकटची मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:59 IST

जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले आहेत. काही पदाधिकारी खानापूर्ती म्हणून महिन्याभरात एक दोन दिवस दिसतात. दोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असतानाही ग्रामीण जनतेच्या काहीच ठोस पदरी पडले नाही. मुळात जनतेच्या पदरी पाडून देण्याचा उत्साहच जि.प.च्या लोकप्रतिनिधीमध्ये राहिला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेलालाही निवडणुकीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसदस्य, विरोधक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह राहिला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित पहिल्यांदाच सात वर्षाचा कार्यकाळ उपभोगायला मिळाला आहे. फुकट मिळालेल्या दोन वर्षाचा आता लोकप्रतिनिधींनाच वीट यायला लागला आहे. सदस्यांचे जि.प.कडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. विरोधकही थंडावले आहेत. काही पदाधिकारी खानापूर्ती म्हणून महिन्याभरात एक दोन दिवस दिसतात. दोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असतानाही ग्रामीण जनतेच्या काहीच ठोस पदरी पडले नाही. मुळात जनतेच्या पदरी पाडून देण्याचा उत्साहच जि.प.च्या लोकप्रतिनिधीमध्ये राहिला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेलालाही निवडणुकीची प्रतीक्षा आहे.नागपूर जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ मार्च २०१७ मध्येच संपुष्टात आला. परंतु न्यायालयीन प्रक्रियेत जि.प.ची निवडणूक अडकल्यामुळे अजूनपर्यंत सरकारला निवडणुकीचा निर्णय घेता येऊ शकला नाही. राज्य सरकारने जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ‘जैसे थे’चे परिपत्रक जारी केले. त्यावर दोन वर्षातही शासन निर्णय घेऊ शकले नाही. परिणामी मुदतवाढ कायम आहे. विद्यमान अध्यक्ष व पदाधिकारी साडेचार वर्षांपासून पदासोबतच शासकीय सुविधांचा लाभ घेत आहेत. नियमानुसार जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा असतो. परंतु, निवडणूक न झाल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांना साडेचार वर्ष झाले आहेत. निवडणुकीच्या कोणत्याही हालचाली नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले विरोधकही निराश झाले आहेत. बराच काळ पदाचा उपभोग घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीला अधिकारी व कर्मचारीही कंटाळले आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीवर भर असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कुणालाही रस नसल्याचे दिसून येत आहे. विषय समिती, स्थायी समितीच्या सभेला सदस्यांची उपस्थिती नगण्य असते. विरोधक थंडावल्यामुळे सत्ताधाऱ्यांचेही चांगलेच फावते आहे.लोकसभेसोबतच घेतल्या पाहिजेत निवडणुकादोन वर्षाचा अतिरिक्त कार्यकाळ मिळाला असला तरी लोकप्रतिनिधींची मानसिकता राहिली नाही. मिनी मंत्रालयाचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्यांचे येणेजाणे कमी झाले आहे. काम करण्याची, लोकांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने निर्णय घेऊन लोकसभेसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आटोपल्या पाहिजेत.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प. नागपूरनिवडणुका जर वेळेत झाल्यास सत्ताधारी असो की विरोधकांमध्ये काम करण्याचा एक उत्साह असतो. फुकटचे मिळत असेल तर त्याचे महत्त्व नसते. हेच जिल्हा परिषदेच्या एकंदरीत कारभारावरून दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुका झाल्याच पाहिजेत.मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते, जि. प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक