लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातमागावर पारंपरिक कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने फुलांच्या बुके ऐवजी आकर्षक व पर्यावरण पूरक कापडाचा बुके तयार केला आहे. कापडाचा बुके या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
विविध समारंभामध्ये फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कायम स्मरणात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल, अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले आणि तेवढेच आकर्षक कापडाचे बुके पहिल्यांदाच हातमाग महामंडळाने तयार केले आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांच्या स्वागतासाठी हा बुके निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे.
नागपूर हे मध्य भारतातील हातमागाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. हात मागावरील विविध तयार कपड्यांना संपूर्ण देशात मागणी आहे. रेशीम साडयांपासून टावेल, चादर, रुमाल, सूती साडया आदी कापड हातमागावर स्वदेशी डिझाईनचा वापर करुन तयार करण्यात येते. यासाठी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार तसेच फॅशनचा अभ्यास करुन कलात्मक व कौशल्याचा वापर करुन पर्यावरण पूरक वस्त्रांची निर्मिती केली जाते. शासनाने हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यामुळेच येथील हातमागवरील वस्तूचे आकर्षण आहे. ही परंपरा पिढयानपिढया जपली जात असतानाच व्यवसायातील तंत्रज्ञानाचे जतन करताना आधुनिकतेची जोड मिळत असल्यामुळे हा समृध्द वारसा जतन होत आहे.
हातमाग महामंडळातर्फे विणकरांना प्रोत्साहन देण्यासोबतच नवनिर्मित कापडांच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हातमागावरील निर्मित कापडाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळेच बाजारपेठेसोबतच स्पर्धा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहेत. फुलांच्या बुकेपेक्षा परवडेल अशा किमतीत कापडांचा बुके तयार करण्यात आला आहे. कापडी बुके ही संकल्पना उमरेड रोडवरील हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरु करण्यात आली असून, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले.
नागपुरी साडी, कोसा, सिल्क आदी दर्जेदार कापड हातमागावर तयार करण्यात आलेल्या बुकेसोबत आकर्षक कापडी बॅग तयार करण्यात आली आहे. कापडी बुकेमध्ये नॅपकीन, रुमाल, टॉवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच हस्तकलेद्वारे निर्मित केलेल्या बकेटमध्ये विविध प्रकारचे हातमाग कापडांचा समावेश असलेले व तेवढयाच आकर्षक संवेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहेत. यासाठी हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरुन विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.
Web Summary : Nagpur promotes handloom tradition. At the assembly session, eco-friendly cloth bouquets replace floral ones. Handloom Corporation initiative offers sustainable, memorable gifts showcasing local craftsmanship and supporting weavers. These bouquets feature useful items like towels and napkins.
Web Summary : नागपुर हथकरघा परंपरा को बढ़ावा देता है। विधानसभा सत्र में, पर्यावरण के अनुकूल कपड़े के गुलदस्ते फूलों की जगह लेंगे। हथकरघा निगम की पहल स्थानीय शिल्प कौशल को प्रदर्शित करने और बुनकरों का समर्थन करने वाले टिकाऊ, यादगार उपहार प्रदान करती है। इन गुलदस्तों में तौलिए और नैपकिन जैसी उपयोगी वस्तुएं हैं।