शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

नागपूर मेट्रो सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:06 IST

शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

ठळक मुद्दे खोदकाम करताना एजन्सीसोबत समन्वय : विद्युत केबल हटविणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची भूमिका निभावली आहे.प्रवाशांची सुरक्षा हे नागपूर मेट्रोचे उद्दिष्ट आहे. बांधकामादरम्यान एखादा अपघात घडल्यास संबंधित वाहनचालकाला किंवा अपघातग्रस्त नागरिकांना आर्थिक मदतीसह त्याला मानसिक आधार देण्याचे कार्य मेट्रो अधिकारी बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विश्लेषण करून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. त्यासाठी मेट्रोतर्फे जनरल कन्सल्टंट आणि सुरक्षा तज्ज्ञ आपली जबाबदारी पार पाडत आहेत तसेच मॉक ड्रीलसारखे उपक्रम राबविले जात आहेत.मेट्रो मार्गावरील विद्युत केबल हटविण्याचे कार्य सुरूनागपूर मेट्रोतर्फे बांधकाम करताना नागपूर शहरातील विविध एजन्सींना विश्वासात घेऊन बांधकाम आणि खोदकाम करण्यात येत आहे. मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, दूरसंचार विभाग आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनींना पूर्वसूचना देऊन आणि त्यांच्यासोबत समन्वय साधून काम करण्यात येत आहे.याकरिता १.३ टक्के देखरेख शुल्क महामेट्रोतर्फे देण्यात येत असून आजपावेतो खोदकाम आणि बांधकाम करतेवेळी लाखो रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देण्यात आले आहे. जमिनीवरून मेट्रो सेवा नागपूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू होणार आहे. तसेच यावर्षीच्या अखेरपर्यंत वर्धा मार्गावरील मेट्रोची सेवा नागरिकांसाठी सुरू करण्याचा मानस महामेट्रोतर्फे निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम कॉरिडोरवरील बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.

नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज अव्वलदेशातील अन्य मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत नागपूर मेट्रोचे अधिकृत फेसबुक पेज अव्वल ठरले असून ४.३५ लाख लोकांनी लाईक केले आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाने कोची मेट्रो प्रकल्पाला मागे टाकले आहे. फेसबुक मित्रांचे अभिनंदन करताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, १२ जानेवारी २०१५ रोजी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज सुरू झाले. ७ सप्टेंबर २०१५ ला १ लाख फेसबुक फे्रंड बनले होते. ११ जुलै २०१६ ला संख्या वाढून २ लाखांवर गेली होती. ४ मे २०१७ ला ३ लाख आणि १८ डिसेंबर २०१७ ला ४ लाखांचा आकडा पार केला होता. आता १० एप्रिल २०१८ ला ही संख्या ४,३५,३२० वर पोहोचली आहे. यासोबत नागपूर मेट्रो प्रकल्पाचे फेसबुक पेज अन्य मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत अव्वल ठरले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर