शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणार २४ बाय ७ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:06 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरास समप्रमाणात योग्य दाबाने व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने नागपूर शहरात २४ बाय ७ ही योजना राबवली जाात आहे. सध्या या योजनेची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के इतकी असून, हा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वर्तविली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : प्रकल्पाची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरास समप्रमाणात योग्य दाबाने व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने नागपूर शहरात २४ बाय ७ ही योजना राबवली जाात आहे. सध्या या योजनेची भौतिक प्रगती ७५.९२ टक्के इतकी असून, हा प्रकल्प ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वर्तविली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असून, पाणीटंचाई असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांमध्ये जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाालेल्या आहेत. त्यामुळे काही भागात दूषित पाण्याच्या समस्या होत्या तसेच पाणीटंचाईचीही समस्या आहे. परंतु २४ बाय ७ अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. बहुतांश कामे झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. ज्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तेथील दूषित पाणी व पाणीटंचाईची समस्या दूर झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Waterपाणी