नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 11:37 PM2021-06-01T23:37:09+5:302021-06-01T23:37:29+5:30

Wife of a police man set herself on fire वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

In Nagpur, the wife of a police man set herself on fire | नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने जाळून घेतले

नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने जाळून घेतले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सुलभा नंदकिशोर देशमुख (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. सुलभा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुजी नगर पोलीस वसाहतीत राहत होत्या. सुलभा यांचे पती नंदकिशोर देशमुख वाहतूक शाखेच्या सक्करदरा चेंबरमध्ये सेवारत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री देशमुख त्यांच्या कर्तव्यावर गेले होते. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास सुलभा यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेतले. आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. त्यांनी आग विझवून सुलभा यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून, हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी केली. सुलभा यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, ते उघड झाले नाही. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

विष प्राशन करून आत्महत्या

 यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवन नगरात राहणाऱ्या रेखा किशोर नायक (वय ४८) या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली.

रविवारी दुपारी १ च्या सुमारास त्यांनी विष घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेखा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी दुपारी ४ च्या सुमारास डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: In Nagpur, the wife of a police man set herself on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस