रेशीमबाग येथील लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या जागेवरून भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर व डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर ट्रस्टचे सदस्य अॅड. रमण सेनाड आमनेसामने आले आहेत. दोघांकडूनही मंडळाच्या जागेवर कुलूप लावण्यात आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या हा वाद आता ठाण्यात पोहचला आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहे.
नागपुरात जेव्हा भाजपा नगरसेवक व संघ स्वयंसेवक आमने-सामने होतात ...
ठळक मुद्देमंडळ एक आणि कुलूप दोन रेशीमबाग येथील लोकमान्य सांस्कृतिक , क्रीडा मंडळाचा वाद : प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग येथील लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या जागेवरून भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर व डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर ट्रस्टचे सदस्य अॅड. रमण सेनाड आमनेसामने आले आहेत. दोघांकडूनही मंडळाच्या जागेवर कुलूप लावण्यात आल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या हा वाद आता ठाण्यात पोहचला आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहे. १९९६ मध्ये या मंडळाची स्थापना संघाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झाली होती. २००० मध्ये डीपीडीसीच्या निधीतून इमारतीचे निर्माण करण्यात आले होते. २००४ मध्ये आमदार व नगरसेवकांच्या परवानगीने मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत होते. यावर्षी येथे शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी हे शिबिर १ मे पासून सुरू होणार आहे. २००९ मध्ये मंडळाच्या नावावर विजेचे मीटरसुद्धा लागले. ३० एप्रिल २०१६ ला मंडळाचे पालकत्व मनपाने स्वीकारले. तत्कालीन मनपा उपायुक्त दांडेगांवकर यांनी ५ ऑगस्टला बैठक घेऊन पालकत्व कायम ठेवत त्याचा अवधीही वाढविला.पण यावर्षी या जागेवरून वादाला सुरुवात झाली. जेव्हा भोयर यांनी महापौरांना ही जागा मनपाच्या आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्याची मागणी केली. शनिवारी भोयर यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांसोबत येऊन कुलूप ठोकले. पण पूर्वीच मंडळाचे कुलूप येथे लागले होते. सेनाड आणि भोयर यांच्यामध्ये यावरून बरीच तूतू-मैमै झाली. अखेर दोघांनीही एकमेकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या हा वाद चर्चेचा विषय बनला आहे. प्रकरण सोडविण्यासाठी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी हस्तक्षेप करतील, अशी शक्यता आहे.एकाने मिटविले नाव, दुसऱ्याने पुन्हा लिहिलेइमारतीवर लिहण्यात आलेल्या मंडळाच्या नावावरून दोघांमध्ये चांगलीच तणातणी झाली. सांगण्यात येते की भोयर यांच्या लोकांनी इमारतीवर लिहिलेल्या नावावर पेंट करून नाव मिटवून दिले. त्यानंतर सेनाड यांच्या समर्थकांनी पुन्हा मंडळाचे नाव पेंट केले. सेनाड यांचा आरोप आहे की नाव पेंट करणाऱ्यांना भोयर यांनी धमकाविलेही होते.खासगी उपयोग होत आहे - भोयरनगरसेवक भोयर यांचे म्हणणे आहे की मंडळाच्या जागेचा सेनाड हे खासगी उपयोग करीत आहे. येथून त्यांचे कार्यालय संचालित होत आहे. येथे असामाजिक तत्त्वांचा अड्डा असतो. त्यामुळे त्यांनी ही जागा कबड्डी प्रशिक्षणासाठी आरक्षित करण्याची शिफारस केली आहे.व्यक्तिगत विरोध - सेनाडरमण सेनाड यांचे म्हणणे आहे की, भोयर व्यक्तिगत कारणाने मंडळाचा विरोध करीत आहे. सेनाड यांचा दावा आहे की, प्रभागाचे अन्य दोन्ही नगरसेवक आमच्या बाजूने आहेत. शीतल कामडे व सतीश होले यांनी मंडळाला पालकत्व देण्याची शिफारस केली आहे. मंडळ बालकांना संस्कारक्षम बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावत आहे.मंडळात होतात हे उपक्रममंडळाजवळ १० हजार वर्गफुट जागा आहे. ४०० वर्गफुट जागेवर हॉल बनविला आहे. ज्यात कराटे, बॉक्सिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्रही चालविण्यात येत आहे. ते आता उघड्यावर होत आहे. सोबतच संस्कृत संभाषण, हस्ताक्षर सुधार व संस्कार शिकवण दिल्या जाते. १ मे पासून येथे शौर्य शिबिर आयोजित क रण्याची तयारी सुरू आहे. मंडळाचे सर्व सदस्य रेशीमबाग शाखेचे स्वयंसेवक आहेत.