शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:43 IST

उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथील ४५.५० एकर जमिनीसाठी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आणि गिरणीचे सदस्य भास्कर मौंदेकर, पुरुषोत्तम मौंदेकर, मुरलीधर मौंदेकर व पुरुषोत्तम बाजीराव यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

ठळक मुद्देहरपूरमधील जमिनीचा वाद : २२ जुलै रोजी पुढील सुनावणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथील ४५.५० एकर जमिनीसाठी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आणि गिरणीचे सदस्य भास्कर मौंदेकर, पुरुषोत्तम मौंदेकर, मुरलीधर मौंदेकर व पुरुषोत्तम बाजीराव यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ही जमीन गिरणीच्या मालकीची असल्याचे घोषित करण्यात यावे, या जमिनीसोबत तृतीय पक्षाचा संबंध निर्माण करण्यास कायमची मनाई करण्यात यावी यासह विविध मागण्या सदरहू दाव्यामध्ये करण्यात आल्या आहेत.न्यायालयाने राज्य सरकार, सहकारी संस्था निबंधक, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजर होण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर २२ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी १९६४ मध्ये कार्यान्वित झाली होती. गिरणीत कापड तयार केले जात होते व तेथे ११०० कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, गिरणीच्या विनंतीवरून राज्य सरकारने गिरणीसाठी १०२.१७ एकर जमीन दिली होती. त्याविषयी ९ एप्रिल १९६४ रोजी जीआर जारी करण्यात आला होता. त्यानंतर १५ डिसेंबर १९६५ रोजी भूसंपादन अधिकाऱ्याने गिरणीला यातील ८८.०३ एकर जमीन हस्तांतरित केली व त्यासंदर्भात तहसीलदाराने ४ मे १९९६ रोजी आदेशही जारी केला. गिरणीने जमिनीच्या मोबदल्यात सरकारला ४ लाख ९६ हजार ७७२.१२ रुपये दिले व जमिनीच्या रेकॉर्डवर स्वत:चे नाव चढवले. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणीशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता यातील ४५.५० एकर जमीन विविध संस्थांना लीजवर दिली. ही कृती अवैध असल्याचे गिरणी व इतर दावाकर्त्यांचे म्हणणे आहे. ही जमीन बळकावण्यासाठी राजकीय शक्ती जोर लावत असल्याचा आरोपही त्यांनी दाव्यात केला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर