शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

पालटकरच्या डोक्यात शिरला होता सैतान, दोन मुलींच्या आयुष्याला लावले ग्रहण

By योगेश पांडे | Updated: March 27, 2024 15:20 IST

जावई, बहिणी, भाचीसह स्वतःच्या मुलाचा केला होता कोल्ड ब्लडेड मर्डर : फाशी तर मिळाली, ती काळरात्री कशी विसरणार ?

नागपूर : उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणाऱ्या क्रूरकर्मा विवेक पालटकर याच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. १० जून २०१८ साली पालटकरच्या डोक्यात अक्षरश: सैतान शिरला होता व त्याने स्वत:ची सख्खी बहीण, जावई, भाची, बहिणीची सासू व स्वत:च्या मुलाचा अगदी ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’च केला होता. पालटकर याला फाशी झाली असली तरी त्याच्या कृत्याची शिक्षा दोन लहान मुलींना आयुष्यभर भोगावी लागणार आहे. त्याची मुलगी व भाची त्या काळरात्री क्रूरकर्म्याच्या तावडीतून सुटल्या होत्या. मात्र त्यांच्या आयुष्यात नेहमीसाठीच ग्रहण लागले आहे.

मौदा तालुक्यातील नवरगावमधील गुलाब पालटकर यांना दोन पत्नी होत्या. त्यातील संध्या नामक पत्नीला विवेक आणि अर्चना ही दोन मुलं होती. गुलाब पालटकर यांच्याकडे १० एकर शेती होती. त्यातील सव्वादोन एकर शेती त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या मुलीच्या नावे केली होती. उर्वरित साडेसात एकरवर नराधम विवेकचा ताबा होता. २०१४ मध्ये त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे तो कारागृहात पोहचला. कारागृहातदेखील त्याच्या डोक्यात सैतानी विचारच असायचे. पवनकर यांच्याशी शेतीवरून वाद सुरू असताना त्याने त्यांच्या घरापासून काही अंतरावरच एक भाड्याचे घर घेतले. पवनकर यांना संपविण्यासाठी १० जून रोजी पहाटे तीन वाजता तो त्यांच्या घरी पोहोचला आणि सर्व जण गाढ झोपेत असतानाच डोक्यावर सब्बलीने वार केले.

सब्बल आडवी मारल्याने त्याचा प्रहार त्याचाच मुलगा कृष्णा व भाची वेदांतीच्या डोक्यावरदेखील झाले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून बहीण अर्चना व सासू मीराबाई जागे झाले. त्यांच्या डोक्यावरदेखील विवेकने सब्बलचे प्रहार करत त्यांची हत्या केली होती. विवेकची मुलगी वैष्णवी व कमलाकरची मुलगी मिताली दुसऱ्या खोलीत झोपल्याने वाचल्या होत्या. मात्र त्या काळरात्रीनंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. एका रात्रीत त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून हिरावल्या गेले. या घटनेच्या जखमा आजही त्यांच्या मनात कायम आहेत.

ज्याने आधार दिला, त्यालाच संपविलेविवेक कारागृहात असताना त्याचे जावई कमलाकर पवनकर यांनीच शेती व त्याच्या मुलामुलीचा सांभाळ केला होता. वैष्णवी व कृष्णा यांच्यावर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. विवेकला कारागृहातून बाहेर आणण्यातदेखील पवनकर यांची मौलिक भूमिका होती. मात्र विवेकला याची कुठलीही कदर नव्हती. शेतीसह मुलांचा ताबा मिळावा यासाठी बाहेर आल्यावर त्याने वाद घालायला सुरुवात केली होती. विवेकची वृत्ती जाणून असल्याने पवनकर यांनी अगोदर नोकरी मिळव असा सल्ला दिला होता. विवेकने जबरदस्तीने शेतीचा ताबा घेतला. त्यामुळे पवनकर दुखावले गेले होते व त्यांनी त्याला सुटकेसाठी खर्च केलेले पैसे मागितले. येथूनच विवेकचे डोके फिरले व त्याने पवनकर यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले होते.

नागपुरातून गाठली दिल्ली, लुधियाना, मुंबई, पंजाबअंगाचा थरकाप उडेल असे हत्याकांड घडवून आणल्यानंतर विवेकने घर गाठले व तेथून सकाळी ९ वाजता रेल्वेने दिल्लीकडे निघाला. तेथून त्याने लुधियाना गाठले व सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरात मजुरी सुरू केली. बारावीनंतर त्याने आयटीआयचा अभ्यासक्रम केला होता. त्याच्या भरवशावर त्याने मुंबईतील एका टेक्सटाईल कंपनीत नोकरी सुरू केली. नऊ महिन्यांनी पंजाबमधील अंबालातील टेक्सटाईल कंपनीत नोकरी लागला. इतके मोठे हत्याकांड केल्यानंतरदेखील तो साळसूदपणाचा आव आणत जगत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी