शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

Nagpur Violence: चेहरे असेही अन् चेहरे तसेही...दवाखाना, पाच वर्षांची मुलगीही टार्गेट

By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 22:58 IST

नागपुरातील हंसापुरीने अनुभवली दहशतीची काळरात्र : अनेक चिमुकले, विद्यार्थी उपाशीपोटीच झोपले

योगेश पांडेनागपूर : दीक्षाभूमी, संघभूमीचे शहर असलेल्या शांतीभूमी नागपूरचे सामाजिक सौहार्द बिघडवून कलंक लावण्याचा काही समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात आला. रात्री साडेआठ ते तीन या दरम्यान महाल, भालदारपुरा, हंसापुरी या भागाने ‘न भुतो न भविष्यति’ अशी दहशत अनुभवली. जमावाला चेहरा नसतो असे म्हणतात, मात्र सोमवारी रात्रीच्या जमावाला भावनादेखील नव्हत्या की काय असेच चित्र दिसून आले. समाजकंटकांनी हंसापुरीतील एक दवाखाना फोडला आणि जवळच राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीलादेखील शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. इतकेच नाही तर सायंकाळपासून असलेल्या तणावामुळे अनेक घरांतील चिमुकले, विद्यार्थी उपाशीपोटीच झोपी गेल्याचे वास्तव दिसून आले; परंतु दुसरीकडे समाजातील काही लोकांनी नागपूरचा सर्वधर्मसमभावाचा खरा चेहरादेखील दाखविला आणि पीडितांच्या मदतीसाठी धाव घेत समाजकंटकांचा कट हाणून पाडला.

हंसापुरीत सायंकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. चिटणीस पार्क, शिवाजी पुतळा चौक, भालदारपुरा येथे जाळपोळ सुरू झाल्यावर पोलिस यंत्रणेचे सर्व लक्ष त्या भागात केंद्रित झाले होते; मात्र हंसापुरीत नियोजनबद्ध पद्धतीने समाजकंटकांनी जमावाला भडकावले व तेथील चौकात ते एकत्रित आले. सेंट्रल एव्हेन्यूला लागूनच असलेल्या वस्तीकडे समाजकंटकांनी मोर्चा वळविला व घाणेरड्या घोषणा देत थेट घरांवर दगडफेक सुरू केली. जुन्या भंडारा मार्गावरील बंडू क्लिनिकमध्ये तोडफोड करत रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे, पट्टा यांची फेकाफेक करण्यात आली. तर जवळील घरात पहिल्या मजल्यावर उभ्या असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीच्या दिशेने दगड फेकत तिला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. मुलगी हात जोडून रडत होती, मात्र समाजकंटकांच्या मनाला पाझर फुटला नाही, अशी माहिती विशाल श्रीवास यांनी दिली.

जमावापासून वाचविण्यासाठी स्वकियांविरोधातच धावदरम्यान, एका गटाच्या तरुणांच्या जमावाने जाळपोळ सुरू केली असताना दुसऱ्या गटात दहशतीचे वातावरण होते; मात्र पहिल्या गटाशी संबंधितच स्थानिक लोकांनी धाव घेत स्वकियांनाच विरोध केला आणि दुसऱ्या गटातील लोकांचा जीव वाचविण्यात मौलिक भूमिका पार पाडली. हा खरा नागपूरचा चेहरा होता अशी भावना रात्री तीन वाजता हंसापुरीतील नागरिकांनी व्यक्त केली.

मध्यरात्रीनंतरदेखील महिला, पुरुष दारातचहंसापुरीत रात्री तीन वाजेपर्यंत दहशतीचे वातावरण होते. अनेक घरांतील लहान मुले जेवण न करताच रडून झोपी गेली. जमावाने परत हल्ला करण्याची धमकी दिली असून मुलांच्या रक्षणासाठी आम्ही दरवाजातच बसून असल्याचे शिवसेेनेच्या पदाधिकारी योगिता रेंगे यांनी सांगितले.

चिंध्या, पेट्रोल आले कुठून ?हंसापुरीत १५ हून अधिक कार, दुचाकी पेटविण्यात आल्या. समाजकंटकांकडून चक्क चिंध्या व पेट्रोलच्या मदतीने वाहने पेटविण्यात आली. तसेच अगदी पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवरील घरांपर्यंत मोठी दगडे फेकण्यात आली. शिवाय बाटल्यांमध्ये चिंध्या पेटवून त्या फेकण्यात आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात ऐनवेळी चिंध्या व पेट्रोल नेमके कुठून आले, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर