शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास परिषदेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 21:29 IST

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी खोटे आरोप करीत आहेत. परंतु मुंढे नागपूर शहराच्या विकासासाठी व कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करीत असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास परिषदेतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी खोटे आरोप करीत आहेत. परंतु मुंढे नागपूर शहराच्या विकासासाठी व कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करीत असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास परिषदेतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.गेल्या वर्षी नागपूर शहरातील नालेसफाईवर एक कोटीहून अधिक खर्च झाला होता. परंतु तुकाराम मुंढे यांनी यावर्षी ३७ लाख रुपयांमध्ये नालेसफाई केली. प्रभावी उपाययोजना केल्याने नागपूर शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात राहिला. १२ क्वारंटाईन सेंटर सुरू केले. खर्च कमी यावा यासाठी राधास्वामी सत्संग मंडळाच्या माध्यमातून मोफत जेवण देण्याची व्यवस्था केली. यात मनपाची मोठी आर्थिक बचत झाली. असे असतानाही मुंढे यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप नागपूर विकास परिषदेने केला आहे. तसेच नागपूर शहरातील सिमेंट रोड, टँंकर घोटाळा, सायबर टेक कंपनीचे सर्वेक्षण, कचरा संकलन, पाणीपुरवठा अशा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.आंदोलनात नागपूर विकास परिषदेचे संयोजक वेदप्रकाश आर्य, भोला बैसवारे, कमलेश चौधरी, दिलीप जयस्वाल, रवींद्र धीधोडे, अशोक काटले, संजय जयस्वाल, मेहनिस खान, जी.एम. साखरकर, संजय शेवाळे, राजीव जैन, प्रकाश भोयर, रोशन भिमटे, अजय मोहर, दयाल चंदवानी, शरद शाहू, सुधीर पाटील, सूरज मेश्राम, राजू तुलशी, महादेव फुके, सुरेंद्र गढे, दारासिंग कटरे, मोरेश्वर जाधव, मोहित आर्य, बाबाराव गावंडे, अनिल मोटघरे, जितू केवलरामाणी, दिलीप सवरानी आदींचा समावेश होता.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेagitationआंदोलन