शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

नागपूर विद्यापीठातील पेपर सेटर्सना २०१७ पासून मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:29 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये मानधनाचा नवा घोळ उघडकीस आला आहे. २०१७ आणि त्यापूर्वीच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना मानधन देण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देघोटाळ्याची शक्यता रेकॉर्डवर मात्र दिल्याची नोंद

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागामध्ये मानधनाचा नवा घोळ उघडकीस आला आहे. २०१७ आणि त्यापूर्वीच्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांना मानधन देण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या विभागाच्या रेकॉर्डवर मात्र संबंधित शिक्षकांना मानधन दिल्याची नोंद आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून मानधनाची रक्कम न मिळाल्याने अनेक शिक्षक विद्यापीठाच्या परीक्षा विभागासोबत वारंवार संपर्क करीत आहेत; मात्र कुणालाच ठोस उत्तर मिळत नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. संपर्ककर्त्या शिक्षकांना मानधन दिल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या नावासमोर मानधनाची उचल केल्याचे दर्शवून स्वाक्षरीही दाखविली जात आहे. प्रत्यक्षात अनेकांना रक्कमच न मिळाल्याने यात घोळ असल्याचे दिसत आहे.मानधनाच्या रकमेसाठी संपर्क करणाऱ्या शिक्षकांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागात येऊन रेकॉर्ड पाहून खातरजमा करण्यास सांगितले जात आहे. अनेक शिक्षक नागपूरबाहेरील असल्याने आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी आपल्या भूमिके वर खंबीर असल्याने शिक्षकांनी मानधनाच्या विषयावर पाणी सोडले आहे. वारंवार फोनवरून संपर्क करणाऱ्या शिक्षकांचे कॉल उचलणेही अधिकाऱ्यांनी बंद केले आहे.

रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ‘लोकमत’ने यासंदर्भात पडताळणी केली. गोपनीय शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, सर्व शिक्षकांच्या मानधनाची रक्कम देण्यात आल्याचे सांगितले. मात्र रेकॉर्ड दाखविण्याचे त्यांनी टाळले. मानधनाची रक्कम मिळाली नसणाऱ्या शिक्षकांची नावे सांगितली असता रेकॉर्ड तपासून माहिती घेऊ, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात शैक्षणिक पाठ्यक्रमांसह पीएचडीच्या नोंदणीसाठी पूर्व प्रवेश परीक्षा (पेट) घेतली जाते. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाते. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या  शिक्षकांना प्रवासभत्ता, डीए आणि मानधन बँकेतील खात्यात जमा करून दिले जाते. मात्र २०१७ व त्यापूर्वीच्या मानधनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यांमध्ये जमा झालीच नाही. हा आकडा लाखो रुपयांच्या घरात असल्याने घोटाळ्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ