शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ वसतिगृह घोटाळा : अखेर प्रकाश शेडमाके निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:43 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिगृहाच्या खात्यातील १२ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीचा अपहार केला होता.

ठळक मुद्देनिधी वसुलीसाठी विभागीय चौकशी लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिगृहाच्या खात्यातील १२ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीचा अपहार केला होता.नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांकडून ‘मेस डिपॉझिट’च्या नावाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये घेण्यात येतात. हे शुल्क एका विशिष्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते व त्या खात्यातून पैसे काढण्याचे कुठलेही अधिकार ‘वॉर्डन’कडे नसतात. माजी ‘वॉर्डन’ डॉ. प्रकाश शेडमाकेने या बँक खात्यातून परस्पर ही रक्कम काढली, अशा तक्रारी विद्यापीठाला प्राप्त झाल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने यासंदर्भात वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.चौकशी समितीसमोर प्रकाश शेडमाकेने केवळ एकदाच उपस्थिती लावली व तेव्हादेखील केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेरपर्यंत आपले लेखी स्पष्टीकरण दिलेच नाही. विद्यापीठाने वारंवार संधी देऊनदेखील शेडमाकेने चौकशीला येण्याचे टाळले. अखेर चौकशी समितीने घोटाळ्याचा ठपका लावत अहवाल कुलगुरूंना सोपविला.चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर कुलगुरूंनी शेडमाकेला निलंबित केले. १२ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीची वसुली करण्यासाठी विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर