शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलण्याचे ‘व्हिजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखड्याला अखेर राज्य शासनातर्फे गठित ‘माहेड’तर्फे मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ‘व्हिजन’ या आराखड्यातून मांडण्यात आले आहे.

ठळक मुद्देबृहत् आराखड्याला ‘माहेड’ची मंजुरी देशात पहिल्या ५० मध्ये ‘रँकिंग’ मिळविण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखड्याला अखेर राज्य शासनातर्फे गठित ‘माहेड’तर्फे मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ‘व्हिजन’ या आराखड्यातून मांडण्यात आले आहे. मूलभूत सुविधा, दर्जा यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासोबतच काळाची गरज ओळखत उद्योगक्षेत्राशी सुसंगत अशी पावले उचलण्याचा संकल्प यातून करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील ‘रँकिंग’मध्ये पहिल्या ५० मध्ये येण्यासाठी विद्यापीठ येत्या पाच वर्षांत जोर लावणार आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बृहत् आराखडा तयार केला.यानिमित्त डॉ. प्रमोद येवले यांच्याशी ‘लोकमत’ने विशेष संवाद साधला आणि आराखड्यातील नेमकी वैशिष्ट्ये जाणून घेतली.

ऐतिहासिक ठरेल बृहत् आराखडाआतापर्यंत बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात यायची. शासनाचा फारसा सहभाग नसायचा. मात्र यंदा शासनाने बृहत् आराखड्यासंदर्भात पुढाकार घेतला. मागील सहा महिन्यांपासून आमची तयारी सुरू होती. विद्यापीठ पातळीवर डॉ. विनायक देशपांडे यांची मसुदा समिती, राज्य पातळीवरील डॉ. के. बी. पाटील यांची समिती यांनी मौलिक परिश्रम घेतले. राज्य पातळीवरील समितीच्या तर सहा बैठकी झाल्या. यंदाच्या बृहत् आराखड्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टींवर जास्त भर देण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक व तांत्रिक आवश्यकता लक्षात घेऊन, स्थानिक संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल यावरदेखील लक्ष देण्यात आले आहे, असे डॉ. येवले यांनी सांगितले.

बृहत् आराखड्याची विशेषताराष्ट्रीय ‘रॅकिंग’मध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविण्याचे ‘टार्गेट‘जीईआर’ वाढविण्यावर भर४१७ महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्यांकनप्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र३० महाविद्यालये व चार विभागांना स्वायत्तता‘पेटंट’ची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न३५० ‘प्लेसमेंट सेल’ची स्थापना२०० हून अधिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचा समावेश२०२४ पर्यंत ३० स्वायत्त महाविद्यालये

बृहत् आराखड्यात महाविद्यालयांच्या दर्जावर भर देण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठात सहा स्वायत्त महाविद्यालये आहेत. मात्र दर्जा वाढविण्यासाठी ही संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे बृहत् आराखड्यात २०१४ पर्यंत ३० स्वायत्त महाविद्यालयांचे ‘टार्गेट’ ठेवण्यात आले असल्याचे डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ