शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 10:30 IST

कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या लोककलांवंताना शासनाने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोरोना जनजागृतीचे काम देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमराठी विभाग करणार माहिती गोळा विभागातील सहा जिल्ह्याची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या लोककलांवंताना शासनाने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोरोना जनजागृतीचे काम देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंताची यादी तयार करण्यात येणार असून, ही जबाबदारी विद्यापीठाच्या मराठी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. (folk artists, Nagpur University)

कोरोना विषाणूच्या साथीने जगावर संकट आले आहे. साथीचा रोग असल्याने सर्व प्रकारच्या जत्रा, मेळे आणि जलसे यावर बंदी आहे. त्यामुळे राज्यातील लोककलावंतांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लोककलावंतांना त्यांच्या लोककलाप्रकाराच्या माध्यमातून कोरोनाविषयक जाणीव जागृतीचे काम देण्याचे ठरविले आहे. यासाठी प्रत्येक जिल्हावार पारंपरिक लोककलावंतांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. राज्यातील विद्यापीठातील मराठी विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी एक समिती तयार करण्याता आली असून, यात प्रत्येक विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील मराठी विभागाकडे नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून ३०० कलावंतांची निवड

५ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. याअंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील लोककलावंतांना कोरोनाविषयक जाणीव जागृती करण्याचे काम मिळणार आहे. या लोककलांच्या कार्यक्रमातून लसीकरण व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचा प्रसार व्हावा, हाही यामागे उद्देश आहे. त्यासाठी कार्यक्रम सादर करणाऱ्या लोककलावंतांना प्रत्येक कार्यक्रमासाठी मानधन मिळणार आहे. वासुदेव-बहुरूपी अशा एकल कलाकारास एका दिवशी ५०० रुपये मिळणार आहेत. एका कलावंताला १० दिवस सादरीकरण करता येईल. प्रत्येक जिल्ह्यातून ३०० कलावंतांची निवड केली जाणार आहे.

 

लोककलावंतांची माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात येईल. त्यातून निवडलेल्या कलावंतांची यादी संबंधित जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांद्वारे लोककलावंतांना जनजागृतीची कामे दिली जातील. तेव्हा लोककलावंत किंवा त्यांच्याशी संबंधित परिचितांनी लोककलावंतांची https://forms.gle/ndEGjnyoa6JNLiJt7 या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती भरून द्यावी.

डॉ. प्रमोद मुनघाटे, विभाग प्रमुख, स्नातकोत्तर मराठी विभाग,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ