शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : कन्हानच्या शाळेची जमीन परत कधी घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:13 IST

कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन परत घेण्यासंदर्भात ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे‘सेरिकल्चर’, ‘बायोटेक्नॉलॉजी’ विभागाला जागा देण्याचा आहे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन परत घेण्यासंदर्भात ठोस कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कन्हान येथे नागपूर विद्यापीठाची ११.८६ एकर जागा आहे.१९७३ साली ही जागा बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्टला शाळा चालविण्यासाठी भाडेपट्टीवर देण्यात आली. या शाळेत सद्यस्थितीत पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. १९ जुलै २०१३ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या ट्रस्टची ‘लीज’ वाढविण्यासंदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. मात्र २०१३ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ‘ट्रस्ट’ शाळेसाठी इतरत्र व्यवस्था करेल, असे या करारपत्रात नमूद होते. मात्र ‘ट्रस्ट’ने ही अट मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यापीठाने २०१३ पासून ‘ट्रस्ट’कडून भाडेच स्वीकारले नाही व कायदेशीर सल्ला घेतला. २ मार्च २०१५ साली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही जागा रिकामी करण्यासाठी ‘ट्रस्ट’ला नोटीस पाठविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आणि २९ जून २०१५ रोजी ही नोटीस पाठविण्यात आली. १६ एप्रिल २०१६ रोजी विद्यापीठाने ही जागा रिकामी करण्यासंदर्भात ‘ट्रस्ट’ला कायदेशीर नोटीस पाठविली. २०१३ पासून या जागेसंदर्भात कुठल्याही भाडेपट्टीचा करार अस्तित्वात नाही.दरम्यानच्या काळात या ‘ट्रस्ट’ची ‘लिज’ वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर निर्णय घेण्यासंदर्भात हा विषय ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला होता. ही जागा परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा आशयाचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता.कन्हान येथील सुमारे अडीच एकरची जागा ही ‘एनएचएआय’ला राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी देण्यात आली आहे. उर्वरित जागी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. तसेच ही जागा नदीच्या काठी असल्याने ‘सेलिकल्चर’ व ‘बायोटेक्नॉलॉजी’ विभागाला विविध प्रकल्प राबविण्यासाठीदेखील जागा देण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले होते.मात्र अद्यापदेखील जागेचा ताबा घेण्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने शाळा प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर