शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

नागपूर विद्यापीठ : विनायक देशपांडे कार्यकारी प्र-कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 21:09 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर २४ तासाच्या आत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांना कार्यकारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर ‘एलआयटी’तील प्रोफेसर डॉ. नीरज खटी यांची परत एकदा प्रशासनात ‘एन्ट्री’ झाली असून त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार देण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या अधिकारात या नियुक्त्या केल्या आहेत.

ठळक मुद्देनीरज खटी यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर २४ तासाच्या आत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांना कार्यकारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर ‘एलआयटी’तील प्रोफेसर डॉ. नीरज खटी यांची परत एकदा प्रशासनात ‘एन्ट्री’ झाली असून त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा प्रभार देण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या अधिकारात या नियुक्त्या केल्या आहेत.नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्र-कुलगुरूंकडे मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रमोद येवले यांच्यानंतरदेखील प्रशासनाची गाडी सुरळीत चालावी यासाठी तातडीने प्र-कुलगुरुंची नेमणूक करणे आवश्यक होते. दुपारी विद्यापीठात कुलगुरूंनी विविध अधिकारी तसेच ज्येष्ठ प्राध्यापकांशी चर्चा केली. सायंकाळी विद्यापीठाचे कामकाज बंद होण्याच्या वेळेवर अचानकपणे ही घोषणा करण्यात आली.डॉ. विनायक देशपांडे हे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठातादेखील होते. एकाचवेळी दोन मोठ्या जबाबदाºया सांभाळण्यात अडचण येईल ही बाब लक्षात घेऊन कुलगुरूंनी व्यवसाय व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. अनंत देशमुख यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठातापदाचा प्रभार सोपविला आहे. सायंकाळी ६.३० वाजता डॉ. देशपांडे यांनी कार्यकारी प्र-कुलगुरूपदाचा प्रभार स्वीकारला. यावेळी कुलगुरुंसमवेत वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अनिल हिरेखण, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.गोवर्धन खडेकर होते.खटींवर परत एकदा विश्वासडॉ. नीरज खटी यांनी विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांच्याकडे बरेच महिने प्रभारी कुलसचिवपदाचा प्रभारदेखील होता. मात्र ‘एलआयटी’मध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची प्रशासकीय कार्यशैली लक्षात घेता कुलगुरुंनी परत एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला व प्रभारी कुलसचिवपदाची परत एकदा जबाबदारी दिली. सध्या खटी यांचा ‘एलआयटी’मध्ये ‘प्रोबेशन’ काळ सुरू असला तरी नियमांनुसार त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कुलगुरूंना आहे, अशी बाब माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड यांनी स्पष्ट केली.देशपांडे यांना प्रदीर्घ अनुभवडॉ. देशपांडे हे नागपूर विद्यापीठाशी गेल्या ३२ वर्षांपासून जुळलेले आहेत. २००९ सालापासून व्यवसाय व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. याशिवाय प्रभारी कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, ‘अ‍ॅकेडॅमिक स्टाफ कॉलेज’चे सहायक संचालक म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. विद्यापीठाची विधीसभा, व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणांचेदेखील ते सदस्य राहिले आहेत.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ