शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ऑगस्टमध्ये होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:35 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पडतील. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची अधिसूचना १२ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे व ऑगस्ट अखेरपर्यत निवडणुका होतील.

ठळक मुद्दे६ जुलै रोजी विद्यार्थी संघटनांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पार पडतील.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका ऑगस्ट महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची अधिसूचना १२ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे व ऑगस्ट अखेरपर्यत निवडणुका होतील. यासंबंधात विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांची काही दिवसांअगोदर बैठक झाली होती.निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभारी कुलसचिव डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची ६ जुलै रोजी बैठक बोलविली आहे. दीक्षांत सभागृहात ही बैठक होईल. प्रत्येक संघटनेच्या चार ते पाच प्रतिनिधींना ४ जुलैपर्यंत नावनोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेची सखोल माहिती देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.१९९४ पासून बंद होत्या खुल्या निवडणुकाराज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये १९९४ मध्ये नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला होता. तोपर्यंत सर्वसाधारण निवडणुकांप्रमाणेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका व्हायच्या. मात्र निवडणुकांतील हिंसा लक्षात घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी परिषद गठित करण्याची प्रणाली सुरु करण्यात आली. १९९६ साली यानुसार सर्वप्रथम निवडणुका झाल्या होत्या. विद्यापीठाशी जुळलेल्या विद्यार्थी संघटनांनी याचा जोरदार विरोध केला होता. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार आता परत खुल्या निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थीElectionनिवडणूक