शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागपूर विद्यापीठ : 'मॅनेजमेंट'वर मंचचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 20:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकांत शिक्षण मंचने बाजी मारली आहे. मंगळवारी विधीसभेच्या बैठकीत झालेल्या निवडणुकीत मंचचे आठही उमेदवार विजयी झाले. ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

ठळक मुद्देआठही जागांवर विजयी : महाआघाडीला धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकांत शिक्षण मंचने बाजी मारली आहे. मंगळवारी विधीसभेच्या बैठकीत झालेल्या निवडणुकीत मंचचे आठही उमेदवार विजयी झाले. ‘यंग टीचर्स असोसिएशन’, ‘सेक्युलर पॅनल’ व विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद या तीन संघटनांच्या महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.नियोजित वेळापत्रकानुसार २८ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेची निवडणूक होणार होती. मात्र निवडणुकींचा वाद न्यायालयात गेला व त्यानंतर प्रक्रिया थंडबस्त्यात पडली. अखेर न्यायालयाच्या निदेर्शानंतर मंगळवारी निवडणूक पार पडली. विधिसभेच्या निवडणुकांमधील निकालांच्या आधारावर एकूण आठ सदस्य तेथून व्यवस्थापन परिषदेत निवडून गेले. अध्यापक गटातून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.नितीन कोंगरे, प्राचार्य गटातून ‘व्हीजेएनटी’ प्रवगार्तून विजयी झालेले डॉ.चंदनसिंग रोटेले, व्यवस्थापन प्रतिनिधी गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झालेले डॉ.सुधीर फुलझेले व पदवीधर गटातून ‘एससी’ प्रवर्गातील विजयी उमेदवार दिनेश शेराम हे व्यवस्थापन परिषदेवर थेट गेले आहेत. विधीसभेतून उर्वरित चार जागांसाठी जोरदार चुरस होती.महाआघाडीतर्फे शिक्षक गटात डॉ. प्रदीप बुटे, प्राचार्य गटात डॉ. मृत्यूंजयसिंग ठाकूर, व्यवस्थापन गटात किशोर उमाठे तर पदवीधर गटात अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी हे उमेदवार होते. तर विद्यापीठ शिक्षण मंचाकडून प्राचार्य गटात डॉ. ऊर्मिला डबीर, शिक्षक गटात डॉ. नीरंजन देशकर, व्यवस्थापन गटात डॉ.आर.जी. भोयर तर पदवीधर गटात विष्णू चांगदे हे निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र मतदारांचे पारडे हे शिक्षण मंचच्या बाजूनेच झुकले. मंचचे चारही उमेदवार यात विजयी झाले. प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली.कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोषविधीसभेची बैठक सुरू झाल्यापासूनच शिक्षण मंच, अभाविपचे कार्यकर्ते विद्यापीठात जमले होते. सुरक्षा व्यवस्थेमुळे परिसराच्या आत कार्यकर्त्यांना येता आले नाही. पार्किंगच्या जागेतच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोलताशे वाजून जोरदार जल्लोष केला.आमदारांची पूर्णवेळ उपस्थितीदरम्यान, विधीसभेचे सदस्य असलेले आमदार डॉ.मिलिंद माने,पंकज भोयर व नागो गाणार हेदेखील निवडणुकीला उपस्थित होते. ही निवडणूक भाजप व संघ वतुर्ळातील वरिष्ठ पातळीवरून गंभीरतेने घेण्यात आली होती. त्यामुळे हे दोघेही आमदार दिवसभर दीक्षांत सभागृहात उपस्थित होते.नामनिर्देशन प्रक्रियेत मतदानव्यवस्थापन परिषदेच्या निवडणुका आटोपल्यानंतर व्यवस्थापन व विधीसभेतील उमेदवारांचे विविध प्राधिकरणावर नामनिर्देशन करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेतून आर.जी.भोयर हे विद्यापरिषदेवर नामनिर्देशित करण्यात आले. तर तक्रार निवारण समितीवर शिक्षकेतर गटातून राजेंद्र पाठक हे नामनिर्देशित करण्यात आले. तर प्राचार्य, अध्यापक व पदवीधर प्रवगार्तून स्थायी समितीवर सदस्य नामनिर्देशनासाठी एकूण अधिक उमेदवार असल्याने मतदान झाले.हे आहेत विजयी उमेदवारप्राचार्य गटखुला प्रवर्ग डॉ.ऊर्मिला डबीर‘व्हीजेएनटी’ प्रवर्ग डॉ.चंदनसिंग रोटेलेअध्यापक व विद्यापीठ अध्यापक गटखुला प्रवर्ग डॉ.नीरंजन देशकरओबीसी प्रवर्ग डॉ.नितीन कोंगरेव्यवस्थापन प्रतिनिधी गटखुला प्रवर्ग डॉ.राजेश भोयर‘एससी’ प्रवर्ग डॉ.सुधीर फुलझेलेनोंदणीकृत पदवीधर गटखुला प्रवर्ग विष्णू चांगदे‘एसटी’ प्रवर्ग दिनेश शेरामनामनिर्देशित सदस्यगट                                                        सदस्य                   प्रवर्गव्यवस्थापन प्रतिनिधींतून विद्यापरिषदेवर डॉ.राजेश भोयर    खुलास्थायी समितीवरील प्राचार्य                     डॉ.ऊर्मिला डबीर  खुलास्थायी समितीवरील अध्यापक                डॉ.प्रकाश पवार   खुलास्थायी समितीवरील पदवीधर                 वसंतकुमार चुटे    खुलातक्रार निवारण समितीवरील अध्यापक  डॉ.नितीन कोंगरे ओबीसीतक्रार निवारण समितीवर शिक्षकेत्तर कर्मचारी राजेंद्र पाठक खुला

 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठElectionनिवडणूक