शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नागपूर विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:57 IST

विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्राधिकरण सदस्यांची मागणी : ‘कोरोना’मुळे धोरणात बदल करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात ‘कोरोना’चे थैमान सुरू असून नागपूरलादेखील त्याचा फटका बसला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सर्व काही ठीक झाले तर विद्यापीठावर सोबतच सर्व परीक्षा घेण्याचा ताण पडणार आहे. यंदाची एकूण स्थिती लक्षात घेता विद्यापीठाने धोरणात बदल करावा व केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच घ्याव्यात. इतर सर्व सत्रांच्या परीक्षा या महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात याव्या, अशी मागणी विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी केली आहे.‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षा व नियमित परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर निकालदेखील उशिरा येतील. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जर १४ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ उठला तरी विद्यापीठाला त्वरित परीक्षा आयोजित करता येणार नाहीत. साधारणत: २३ ते २५ एप्रिलपासूनच परीक्षा घेता येतील.यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले आहे. आगामी काळात विद्यापीठाच्या परीक्षा व इतर शैक्षणिक महत्त्वाच्या बाबी या अधिक क्षमतेने आपल्यासह इतर सर्व घटकांना पार पाडाव्या लागतील. जर ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिल रोजी उठले तर परीक्षा या २० एप्रिलपासूनच घ्याव्यात, शिवाय प्राध्यापकांना २ मे पासून पेपर तपासणी बंधनकारक करावी. अगोदर अंतिम वर्षाचे निकाल लावावेत व इतर वर्षांचे वर्ग १ जुलैपासून सुरूकरावेत, अशी मागणी चांगदे यांनी केली आहे. मात्र स्थितीत सुधारणा झाली नाही तर विद्यापीठाने केवळ अंतिम वर्षाच्याच परीक्षा घ्याव्या. इतर सर्व परीक्षा जून महिन्यात महाविद्यालय स्तरावर घ्याव्यात. महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी पेपर तपासून त्याचे गुण विद्यापीठाकडे पाठवावेत, अशी सूचना चांगदे यांनी केली आहे.वेळापत्रक जारी केल्यानंतर १५ दिवसांचा वेळ द्या‘लॉकडाऊन’नंतर विद्यापीठाला नवे वेळापत्रक घोषित करावे लागणार आहे. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे बाहेरगावी राहतात. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला वेळ लागू शकतो. शिवाय त्यांना यायलादेखील काही वेळ लागेलच. त्यामुळेच हे वेळापत्रक जारी झाल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा १५ दिवसांच्या कालावधीनंतर घ्याव्यात, अशी मागणी विधिसभा सदस्य अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे. अंतिम वर्षाच्याच परीक्षा विद्यापीठाने घ्याव्या व इतर परीक्षा महाविद्यालयीन पातळीवर घेऊन जुलैपर्यंत निकाल लावावे, ही भूमिका मांडली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा