शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

नागपूर विद्यापीठ : ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षा 'पोस्टपोन' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 00:37 IST

‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादेखील ‘पोस्टपोन’ केल्या आहेत.

ठळक मुद्दे'कोरोना'मुळे आतापर्यंत ८० टक्के परीक्षा पुढे ढकलल्या, लाखो विद्यार्थ्यांचे शासनाकडे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादेखील ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. या निर्णयामुळे चौथ्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याची ही तिसरी वेळ असून आतापर्यंत विद्यापीठाच्या ८० टक्के परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्या आहेत.‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने सर्वात प्रथम ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार होता. सुमारे २८३ परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते. त्यानंतर २८ मार्च रोजी विद्यापीठाने त्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले. ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलपर्यंत राहील व त्यानंतर स्थिती सामान्य होईल असा अंदाज होता. परंतु तसे होऊ शकले नाही.महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार विद्यापीठाने १५ एप्रिलपर्यंतच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आतापर्यंत साधारणत: साडेसहाशेहून अधिक परीक्षा पुढे ढकलल्या असून यात पावणेचार लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते.शासन निर्देशांनंतर पुढील पाऊलपरीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक जारी केले आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर परीक्षांच्या पुढील वेळापत्रकाबाबत निर्णय होईल असे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.परीक्षा विभागाची कसरतचआता पुढील परीक्षांचे नियोजन करण्यासंदर्भात परीक्षा विभागाची कसरतच होणार आहे. पुरवणी परीक्षा, नियमित परीक्षा यांच्यासह ‘पोस्टपोन’ केलेल्या परीक्षांचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निश्चितच राहणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्येदेखील चलबिचल वाढली आहे. विशेषत: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे काय होणार, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.या आहेत प्रमुख परीक्षा

  •  फार्मसी, गृहविज्ञान, बीकॉम दुसरे व चौथे सत्र
  •  अप्लाईड गृहविज्ञान, इंटेरिअर डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेन्ट
  •  एम.ए., एमएस्सी, एमएसडब्ल्यू
  •  बीए-एलएलबी चौथे व दहावे सत्र
  •  पदव्युत्तर गृहविज्ञान पहिले व तिसरे सत्र
  •  आर्किटेक्चर दहावे सत्र
  •  बी.ई. दुसरे, चौथे, सहावे व आठवे सत्र
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा