शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ऑनलाईन वर्ग सुरू, निकालांची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून ‘ऑनलाईन’ वर्गांना सुरुवातदेखील झाली आहे. मात्र अद्यापही अगोदरच्या सत्रांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडून होतोय प्रश्नांचा भडिमार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून ‘ऑनलाईन’ वर्गांना सुरुवातदेखील झाली आहे. मात्र अद्यापही अगोदरच्या सत्रांचे निकाल जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पदव्युत्तर विभागप्रमुख तसेच महाविद्यालयातील प्राचार्यांवर सातत्याने विद्यार्थ्यांकडून प्रश्नांचा भडिमार होत आहे.मात्र निकाल कधी जाहीर होतील याची माहिती त्यांनादेखील नाही.‘कोरोना’मुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात बहुतांश अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षाच झाल्या नाहीत. अंतिम वर्ष वगळता इतर सत्रांचे निकाल अगोदरच्या सत्रांच्या कामगिरीवर लावण्याचे राज्य शासनातर्फेनिर्देश देण्यात आले होते. परंतु निकाल लावण्याचे नेमके सूत्र काय असेल याबाबत सुरुवातीला नेमकी निश्चितता नव्हती. शिवाय विद्यापीठांना त्यादृष्टीने प्राधिकरणांची मंजुरी घेऊन नवीन नियमदेखील तयार करणे अनिवार्य होते. विद्यापीठाचे शैक्षणिक सत्रदेखील १४ ते १५ जून ऐवजी १७ ऑगस्ट रोजी सुरू झाले.आता ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू झाले असले तरी निकाल जाहीर झालेले नाहीत. अशा स्थितीत नेमके निकाल आता लागणार की आणखी प्रतीक्षा करावी लागणार याबाबत चित्र स्पष्ट नाही. निकालच लागले नाही मग पुढील सत्रांचे वर्ग का घ्यायचे व डोकेदुखी का वाढवून घ्यायची अशी काही महाविद्यालयांची भूमिका आहे. काही ठिकाणी नियमित ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू झाले आहेत. मात्र निकालांचा संभ्रम कायम असल्याने विद्यार्थीदेखील फारसे उत्साही नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.लवकरच दिशानिर्देश जारी करणारयासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता लवकरच निकालासंदर्भातील दिशानिर्देश जारी करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या निर्देशानुसारच निकालांचे सूत्र ठरविण्यात आले आहे. याबाबत सर्व महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना लवकरच कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठonlineऑनलाइन