शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वेदप्रकाश मिश्रांना यांना नागपूर विद्यापीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:53 IST

गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देस्नातकोत्तर पदविका वाड्.मय चौर्यकर्मप्रकरण : १५ दिवसांत उत्तर देण्याची मुदत

आॅनलाईन लोकमतनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकरणात विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर ‘मॅरेथॉन’ चर्चा झाली. यानंतर ही नोटीस बजाविण्याचे ठरविण्यात आले.डॉ.मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोध प्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालिन विधीसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी १९९१ मध्ये लावला होता. तत्कालिन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या.रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. यानुसार डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहीलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालिन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ.मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ.मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.यासंदर्भात गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या नोटीशीच्या माध्यमातून डॉ.मिश्रा यांच्याकडून या प्रकरणात लेखी स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे. यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. १ महिन्यानंतर परत परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात येणार असून यावेळी त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पक्ष मांडावा लागेल. त्यानंतर परीक्षा मंडळ पुढील निर्णय घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉ.मिश्रा यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व नैसर्गिक न्यायानुसार त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.मिश्रांना कसा मिळाला पुरस्कार ?डॉ.वेदप्रकाश मिश्रा प्रणित ‘सेक्युलर पॅनल’ने मागील महिन्यात झालेल्या प्राधिकरण निवडणूकांत यश मिळविले. डॉ.मिश्रा यांचा विद्यापीठ वर्तुळात प्रभाव असून त्यांना विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान मानण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. जर मिश्रा यांच्याविरोधात असे आरोप होते, तर त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पुरस्काराच्या निवड समितीत आताच्या परीक्षा मंडळातील काही सदस्य होते.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर