शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपला ‘आरटीएमएनयू’ असे नाव देण्यावरून दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:38 IST

एका ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’च्या ‘अ‍ॅडमिन’ला ‘आरटीएमएनयू’ हे नाव वापरविण्यावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली होती. या मुद्द्यावरुन विद्यापीठ वर्तुळात चर्चांचे मोहोळ उठले असून ‘अ‍ॅडमिन’ महेंद्र निंबर्ते यांनी या नोटीशीला उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देमहेंद्र निंबर्तेंचे विद्यापीठाच्या नोटीशीला प्रत्युत्तर कुलगुरू, कुलसचिवांवर केली टीका

आॅनलाईन लोकमतनागपूर : एका ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’च्या ‘अ‍ॅडमिन’ला ‘आरटीएमएनयू’ हे नाव वापरविण्यावरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली होती. या मुद्द्यावरुन विद्यापीठ वर्तुळात चर्चांचे मोहोळ उठले असून ‘अ‍ॅडमिन’ महेंद्र निंबर्ते यांनी या नोटीशीला उत्तर दिले आहे. विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठाची ओळख जर प्रशासन ‘आरटीएमएनयू’ अशी सांगत असेल तर तो राष्ट्रसंतांचा अपमान आहे, असे निंबर्ते यांनी म्हटले आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबर्ते यांनी ‘आरटीएमएनयू-ए’ या नावाचा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ तयार केला आहे. या ‘ग्रुप’चे ‘आयकॉन’ म्हणून नागपूर विद्यापीठाच्या इमारतीचे चित्र लावले होते. यात शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. विद्यापीठासह समाजातील विविध घडामोडींवर येथे मतमतांतरे व्यक्त करण्यात येतात. या ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ आणि विद्यापीठाचे छायाचित्र वापरल्यामुळे विद्यापीठाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, असे कारण देत प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली होती. विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांना ‘ग्रुप’मधून न काढल्यास फौजदारी कारवाईचा इशारादेखील देण्यात आला होता.या नोटीशीला उत्तर देताना निंबर्ते यांनी कुलगुरू व कुलसचिवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुलगुरू व कुलसचिवांच्या विरोधात आवाज उठविला म्हणून त्यांनी असे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाचे नाव ‘आरटीएमएनयू’ असे नाही. विद्यापीठाच्या कुठल्या कायद्यानुसार असे नाव किंवा ‘शॉर्टफॉर्म’ ठरविण्यात आला, असा प्रश्न निंबर्ते यांनी उपस्थित केला आहे. ‘आरटीएमएनयू’चा आमचा ‘फुलफॉर्म’ हा ‘रिस्पेक्टिव्ह टीचर्स, मॅच्युअर नेटीझन्स अ‍ॅन्ड यू’ असा असून ‘ग्रुप आयकॉन’मध्ये विद्यापीठासमोर घेतलेले माझे छायाचित्र टाकले आहे. शिवाय या ‘ग्रुप’चे अनेक लोक ‘अ‍ॅडमिन’ आहेत. तरीदेखील जाणीवपूर्वक माझ्याविरोधात हे पाऊल उचलण्यात आले, असा आरोप निंबर्ते यांनी उत्तरातून केला आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप