शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ :  माजी विद्यार्थी बदलविणार ‘फार्मसी’ विभागाचा ‘लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:37 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधविज्ञान म्हणजेच ‘फार्मसी’ विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विभागाचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोट्यवधी रुपये एकत्र करण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याला नुकतीच सुुरुवात झाली. मागील ६२ वर्षांत प्रथमच असा विधायक प्रयोग राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देइमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधविज्ञान म्हणजेच ‘फार्मसी’ विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विभागाचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोट्यवधी रुपये एकत्र करण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याला नुकतीच सुुरुवात झाली. मागील ६२ वर्षांत प्रथमच असा विधायक प्रयोग राबविण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठाच्या औषधविज्ञान विभागाची सुरुवात १९५६ साली झाली. त्यानंतर येथून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली. विभागाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटनेकडून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजनदेखील करणे सुरू झाले. मात्र विभागाचे आपण आणखी काहीतरी देणे लागतो या विचारातून माजी विद्यार्थी संघटनेने इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला.विभागाच्या नूतनीकरणासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात सभागृहाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरुप देण्यात येणार आहे. सोबतच विद्यार्थिनींसाठी ‘कॉमनरुम’, ‘कॉन्फरन्स रुम’ यांचेदेखील बांधकाम होईल. यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून विद्यार्थ्यांनीच ही रक्कम उभी केली आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत या पहिल्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन झाले. मार्च २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ.जस्मीन आवारी व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुहास दासवडीकर हेदेखील उपस्थित होत्या. ‘युडीपीएस’ माजी विद्यार्थी संघटना समन्वयक डॉ.प्रकाश इटनकर यांनी प्रास्ताविकादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. डॉ.प्रशांत पुराणिक यांनी आभार मानले.या कार्यासाठी विभागाचे माजी विद्यार्थी पुरुषोत्तम अग्रवाल, सतीश राजकोंडावार, प्रदीप गद्रे, सुधीर देशपांडे, डॉ.अन्वर दाऊद, रवलीनसिंग खुराणा, सारंग उपगन्लावार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.महागडी यंत्रेदेखील दुरुस्त केलीविभागामधील काही महागडी यंत्रे नादुरुस्त झाली होती. यांच्या दुरुस्तीचा खर्च हा फार जास्त होता. विद्यापीठाच्या तरतुदीमधून ते शक्य नव्हते. अशा स्थितीत माजी विद्यार्थी संघटनेने यासाठी पुढाकार घेतला व महागडी यंत्रे दुरुस्त करुन देण्यासाठी सहकार्य केले. पुढील पाच वर्ष या यंत्रांच्या देखरेखीचा भारदेखील संघटनेने आपल्या खांद्यावर उचलला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी