शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : बृहत् आराखड्यात कौशल्यविकासावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार झाला असून प्रशासनाने तो राज्य शासनाला सादर केला आहे. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बृहत् आराखड्याला 'माहेड' या वैधानिक आयोगाची लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्दे‘माहेड’द्वारा लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार झाला असून प्रशासनाने तो राज्य शासनाला सादर केला आहे. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बृहत् आराखड्याला 'माहेड' या वैधानिक आयोगाची लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.आतापर्यंत बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाचा स्तर खालावला. मात्र २०१६ च्या सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींनुसार प्रत्येक विद्यापीठाने पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. विद्यापीठांचे बृहत् आराखडे म्हणजे निव्वळ नवीन महाविद्यालयांना मान्यता ही संकल्पना मोडून काढत सर्वांगीण विकासावर भर कसा राहील, असे यात अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यापीठाने तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापित केली होती. विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या होत्या.सखोल अभ्यास केल्यानंतर विद्यापीठाने शास्त्रीय पद्धतीने बृहत् आराखडा तयार केला. यात वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. बृहत् आराखड्यात कौशल्याधिष्ठित व विविध विद्याशाखांना एकत्रितपणे जोडणारे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. यात सुमारे २०० नवे अभ्यासक्रम अधोरेखित करण्यात आले आहेत. उद्योगक्षेत्राला अपेक्षित असणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठातून तयार कसे होईल, याचा यात विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ व महाविद्यालयांत संशोधन वाढीसंदर्भातदेखील विशेष उद्दिष्टे प्राधान्यक्रमाने ठरविण्यात आली आहेत. 

ग्रामीण भागासाठी विशेष उद्दिष्टेबृहत् विकास आराखडयाची चौकट निश्चित करताना ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबाबतदेखील मुद्दे प्रस्तावित आहेत. सोबतच या भागातील उच्चशिक्षण सुविधा, सामाजिक समस्या संशोधनातून सोडविण्याची जबाबदारी, उद्योजकता विकास, स्वायत्तता यावरदेखील भर देण्यात आला आहे. परीक्षा प्रणालीतील सुधारणांचे उद्दीष्टदेखील ठेवण्यात आले आहे.काय असतो बृहत् आराखडा?येणाऱ्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावले उचलली जातील या बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश असतो. सोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वांच्या प्रतिक्रिया मागवून मग एक योजना तयार करण्यात येते. सर्वसमावेशक विकास असा उद्देश असलेली ही योजना दीर्घ कालावधीसाठी असते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर