शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागपूर विद्यापीठ : अखेर कुलसचिव नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णकालीन कुलसचिवांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मागील सात महिन्यांपासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारी पदावरुनदेखील बराच वाद निर्माण झाला होता. मात्र आता पूर्णवेळ पदच भरण्यात येणार असून लवकरच त्यासंदर्भात जाहिरात जारी करण्यात आली आहे. २५ मार्चपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या आधारावर नियुक्ती अवलंबून असेल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसात महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णकालीन कुलसचिवांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मागील सात महिन्यांपासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारी पदावरुनदेखील बराच वाद निर्माण झाला होता. मात्र आता पूर्णवेळ पदच भरण्यात येणार असून लवकरच त्यासंदर्भात जाहिरात जारी करण्यात आली आहे. २५ मार्चपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या आधारावर नियुक्ती अवलंबून असेल, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.कुलसचिव पदावरून डॉ. पुरण मेश्राम यांना ३० जून रोजी निवृत्त करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारकडून आल्यानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी डॉ. मेश्राम यांना निवृत्तीचा आदेश दिला होता. डॉ. मेश्राम यांनी कुलसचिव पदावर आणखी दोन वर्षे कायम ठेवण्याची मागणी केली होती. डॉ. पुरण मेश्राम यांना सहायक कुलसचिव ते कुलसचिव या पदावर नियुक्ती होत असताना त्यांना शिक्षक प्रवर्गाची वेतनश्रेणी देण्यात आली होती. त्यामुळे कुलसचिव पदावर प्रोफेसर ग्रेड असल्याचा दावा करीत त्यांनी वेतनश्रेणी व सेवानिवृत्तीचा कालावधी ६० वर्षे देण्यात यावा, अशी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने डॉ. मेश्राम यांना कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही, तर याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. त्यामुळे न्यायालयीन आदेश नसल्याने डॉ. मेश्राम यांना सेवानिवृत्त करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. दरम्यान, ऑगस्ट २०१८ पासून विद्यापीठातील कुलसचिव पद रिक्त आहे. त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी आक्षेपदेखील घेतला होता व राज्य अनुसूचित जाती आयोगात तक्रारदेखील केली होती. आयोगाच्या शिफारशीनंतरदेखील डॉ.हिरेखण यांना प्रभार देण्यात आला नाही.दरम्यान, नियमित कुलसचिव नियुक्त करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. काणे यांनी घेतला व त्यानुसार जाहिरात काढण्यात आली. ही हायकोर्टात डॉ. मेश्राम यांच्या प्रलंबित असलेल्या याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRegistrarकुलसचिव