शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूर विद्यापीठ : अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:20 IST

Nagpur University,relief to students,nagpur news राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता १९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९ डिसेंबरपर्यंत भरता येणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता १९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनीदेखील मागणी केली होती. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकदेखील जारी केले आहे.

‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर डिसेंबर महिन्यात निघाला. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता, विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमामध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी, एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व ‘एमआयआरपीएम’ (मास्टर ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स अ‍ॅन्ड पर्सनल मॅनेजमेंट) यांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे होते व २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती.

मात्र अनेकदा ‘सर्व्हर डाऊन’ होणे, मोबाईल अगोदरच ‘रजिस्टर’ झाला आहे, असे लिहून येणे, असे विद्यार्थ्यांना संदेश आले. तर काही विद्यार्थ्यांच्या सहाव्या सत्राच्या गुणपत्रिका अवैध असल्याचे दाखविल्या गेले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व संघटनांकडून करण्यात आली. अखेर विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.

आता १६ जानेवारीपासून वर्ग

नियोजित वेळापत्रकानुसार १४ जानेवारीपासून प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात होणार होती. परंतु विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जारी केले असून, त्यानुसार १६ जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत, तर २९ डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज दाखल करणे - १९ डिसेंबरपर्यंत

तात्पुरती गुणवत्ता यादी - २५ डिसेंबर

आक्षेप - २६ ते २८ डिसेंबर

अंतिम गुणवत्ता यादी - २९ डिसेंबर (३ वाजता)

पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम - ३० ते ३१ डिसेंबर

जागांची वाटप यादी - ३ जानेवारी

महाविद्यालयात रिपोर्टिंग - ४ ते ८ जानेवारी

पहिल्या यादीतील रिक्त जागा - ८ जानेवारी

दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम - ८ ते १० जानेवारी

जागांची वाटप यादी - १२ जानेवारी

महाविद्यालयात रिपोर्टिंग - १३ ते १५ जानेवारी २०२१

शैक्षणिक वर्गांना सुरुवात - १६ जानेवारी २०२१

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी